शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खैरे कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

By admin | Updated: April 25, 2016 02:47 IST

खैरे कुणबी बहुउद्देशीय विचार मंचद्वारे सरदार वल्लभभाई पटेल मैदानात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या नवदाम्पत्यांना शुभेच्छा नागपूर : खैरे कुणबी बहुउद्देशीय विचार मंचद्वारे सरदार वल्लभभाई पटेल मैदानात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार देवराव रडके, मनपाचे परिवहन सभापती नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर उपस्थित होते. समाजाच्या प्रगतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या खैरे कुणबी बहुउद्देशीय विचार मंचतर्फे पहिल्यांदाच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात खैरे कुणबी समाजातील सहा जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. मंचातर्फे प्रत्येक जोडप्याला पाच भांडे भेट देण्यात आली. या विवाह सोहळ्यासाठी नागपूर विभागातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित झाले होते. याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की, शेतकरी कुटुंबासाठी सामूहिक विवाह सोहळे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात आपल्या मुला-मुलींचे लग्न थाटामाटात करता येते. लग्नात होणारा अवाढव्य खर्च, त्यासाठी घेण्यात येणारे कर्ज, या सोहळ्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्यापासून वाचतो. प्रत्येक समाजाने अशा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून, अवाढव्य होणारा खर्च थांबवावा. गडकरींनी सर्व जोडप्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाग्यश्री गिल्लोरकर, वंदना पाल, माजी महापौर पांडुरंग हिवरकर, डी. के. आरीकर, शेषराव येलकर, प्रदीप वादाफले, डॉ. विलास भोयर, अ‍ॅड. रमेश कोठाळे, भगवंतराव रडके पाटील, आस्तिक शहारे, भगवान रडके, विठ्ठलराव हुलके, नारायण नरुले, बळवंत भोयर, डॉ. आशिष पोंगळे, दिगांबर उपरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)