शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
5
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
6
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
7
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
8
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
9
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
10
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
11
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
12
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
13
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
14
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
15
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
16
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
17
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
18
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
19
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
20
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता सोपी, पण महापौरांसाठी कठीण

By admin | Updated: May 27, 2014 01:43 IST

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी आयोगाने आचारसंहिता लागू केली असली तरी ती लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे कठोर नाही. मात्र भाजपचे उमेदवार अनिल सोले हे

काही शंका : आयोगाकडून स्पष्टीकरण मागविणार

नागपूर : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी आयोगाने आचारसंहिता लागू केली असली तरी ती लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे कठोर नाही. मात्र भाजपचे उमेदवार अनिल सोले हे खुद्द महापौर असल्याने त्यांच्यासाठी ती कठीण ठरण्याची शक्यता आहे. २० मे रोजी आयोगाने निवडणूक आचारसंहिता लागू केली. मात्र त्यात स्पष्टता नसल्याने विभागीय आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी अनुपकुमार यांनी आयोगाकडून काही बाबींचा खुलासा करून घेतला. त्यानुसार पदवीधर मतदारांवर प्रभाव पडू शकेल असे कुठलेही निर्णय राज्य शासन किवा विविध प्राधिकरणाला घेता येणार नाही. जिल्हा नियोजन समिती किंवा तत्सम बैठका घेण्यास मनाई नाही. फक्त त्यात निवडणुकीशी संबंधित अधिकार्‍यांना सहभागी होता येणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्‍यांना त्यांची वाहनेही परत करण्याची गरज नाही असे अनुपकुमार यांनी स्पष्ट केले. मात्र नागपूरमध्ये वेगळी परिस्थिती आहे. येथे खुद्द महापौरच भाजपचे उमेदवार असल्याने त्यांना महापालिकेच्या बैठका व इतर निर्णय घेता येणार नाही. उमेदवार असल्याने त्यांना महापालिकेच्या वाहनाचाही वापर करता येणार नाही, असे अनुपकुमार यांनी स्पष्ट केले. आचारसंहितेच्या बाबतीत अद्यापही काही शंका आहेत, त्याबाबत वेळोवेळी आयोगाकडून स्पष्टीकरण मागविले जाईल, असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत खाजगी किंवा शासकीय इमारतीचे विद्रुपीकरण करता येणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मतदारांची यादी विभागीय आयुक्तांच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. येत्या काही दिवसातच मतदान केंद्राची यादीही त्यावर टाकण्यात येईल. त्यामुळे मतदारांना कोणत्या भागातील मतदान केंद्रावर जायचे आहे हे लक्षात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)