शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

‘सीएनजी-एलएनजी’मुळे पैशांची बचत व प्रदूषणमुक्ती : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 9:29 PM

सीएनजी, एलएनजीमुळे पैशांची बचत होऊन त्यासोबतच शहर प्रदूषणमुक्त होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना फायदा होऊन रोजगार निर्मिती होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

ठळक मुद्दे डिझेलच्या तुलनेत होणार मोठी बचत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सीएनजी, एलएनजीमुळे पैशांची बचत होऊन त्यासोबतच शहर प्रदूषणमुक्त होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना फायदा होऊन रोजगार निर्मिती होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.ऑटोमोटिव्ह चौकाजवळील रॉमॅट सीएनजी पंपाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, सध्या महानगरपालिकेच्या बसेस डिझेलवर धावतात. डिझेलची किंमत ६९ रुपये लिटर असून त्यापासून ३ किलोमीटरचे अ‍ॅव्हरेज मिळते. प्रति किलोमीटर त्याची किंमत २३ रुपये होते. सीएनजी ४६ रुपये किलो असून ४ किलोमीटरचे अ‍ॅव्हरेज देते. त्याची किंमत दर किलोमीटरला ११.५० रुपये पडते. त्यामुळे महापालिकेच्या ४५० बसेसचे सीएनजीत रूपांतर करण्यात येणार आहेत. एलएनजी हे भविष्यातील इंधन आहे. ५० किलोमीटरच्या अंतरासाठी सीएनजी हे इंधन चांगले आहे. यात डिझेलच्या तुलनेत मोठी बचत होते. ट्रॅक्टरसाठी त्याचा फायदा होण्याची गरज आहे. आगामी काळात विदर्भातील शेतकरी सीएनजी तयार करतील, अशी संकल्पना आहे. सध्या आमच्या प्रकल्पात १८ टन सीएनजी तयार करीत आहोत. तणसापासून सीएनजी तयार करण्याचे पाच प्रकल्प टाकत आहोत. तुमसरमध्ये एक प्रकल्प सुरू आहे. पाच टन तणसापासून एक टन सीएनजी तयार होणार आहे. रामटेक तालुक्यात लिपिअर ग्रास लावणार आहे. एक एकरात २०० टन लिपिअर ग्रास होईल. हे गवत बायो डायजेस्टरमध्ये टाकून त्यापासून बायो सीएनजी तयार करण्याची योजना आहे. विदर्भात यामुळे एक लाख रोजगार निर्मिती होऊन शेतकऱ्यांनाही एका एकरात दोन लाखाचा फायदा होईल. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धाला डिझेलपासून मुक्ती देणार आहोत. महापालिकेत सात बायो डायजेस्टर आहेत. टॉयलेटचे पाणी विकून १८० कोटी रुपये मिळत आहेत. सात बायो डायजेस्टरमध्ये घाण पाण्यापासून मिथेन काढून मिथेनपासून ‘सीओ-२’ वेगळे करून बायो सीएनजी काढणार आहोत. मटन, मच्छी मार्केटमधील वेस्टपासून बायो सीएनजी तयार करण्यात येणार आहे. या मार्गाने ट्रॅक्टर, बसेससाठी सीएनजी मिळणार आहे. ते प्रदूषणमुक्त असून जैविक इंधन आहे. स्पाईस जेटचे विमान २५ टक्के बायो एव्हीएशन फ्युअलवर डेहरादुन ते दिल्लीला आणले होते. भविष्यात लिपिअर ग्रास, तुराट्यापासून बायो सीएनजी तयार करून बसेस धावतील. त्यामुळे डिझेलच्या तुलनेत ५० टक्के बचत होणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPublic Transportसार्वजनिक वाहतूकNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका