शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपवर आल्या प्रश्नपत्रिका! बारावीचे भौतिकशास्र, रसायनशास्त्राचे पेपर फुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 05:56 IST

Nagpur Paper Leak: नागपूरमध्ये बारावीचे दोन पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन विषयाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना थेट व्हॉट्सॲपवर पाठवल्या गेल्या.

नागपूर : नागपुरात बारावीचा रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तीने प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲपवर पाठविल्या. एका परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. दोन विद्यार्थिनींची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल दहीफळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पेपर फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा पेपर किती जणांपर्यंत पोहोचला; तसेच या रॅकेटमध्ये किती जण सहभागी आहेत, याची माहिती पोलिस घेत आहेत.

विद्यार्थिनीच्या झडतीत उघड झाला प्रकार

सिव्हिल लाइन्स परिसरातील सेंट उर्सुला हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर बुधवारी पेपर सुरू असताना एक विद्यार्थिनी बारा वाजण्याच्या सुमारास प्रसाधनगृहात गेली. १५ मिनिटे ती वर्गात न आल्याने पर्यवेक्षकांना संशय आला.

तिची झडती घेतली असता स्मार्ट फोन आढळला. तो तपासला असता एका व्हॉटस्अॅप ग्रुपवर परीक्षेआधीच पेपर आलेला होता. त्याच ग्रुपवर उत्तरेसुद्धा आलेली होती. संबंधित विद्यार्थिनीने मैत्रिणीचेही नाव सांगितले. दोघीही त्या एकाच व्हॉटस्अॅप ग्रुपवर असल्याचे स्पष्ट झाले. १६ फेब्रुवारी रोजी झालेला भौतिकशास्त्राचाही पेपर त्यात आढळला.

शिक्षण मंत्रालयाकडून दखल

शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल देण्याचेही आदेश दिले आहेत. खासगी कोचिंग क्लास असो, खासगी व्यक्ती असो किंवा विभागाशी संबंधित कोणीही असो; जर या प्रकरणात कोणी सहभागी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे भोयर यांनी स्पष्ट केले.

संबंधित पेपरफुटीमुळे विभागीय शिक्षण मंडळाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पेपरफुटीत कोणत्या परीक्षा केंद्राचा किंवा विभागीय कर्मचाऱ्याचा सहभाग होता का, याची चौकशी सुरू आहे.  

66 संशयित विद्यार्थिनीच्या मोबाइलमधील व्हॉट्सअॅप ग्रुपवर रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विषयाचे पेपर आढळले. याची चौकशी करून कारवाई केली जाईल. -डॉ. शिवलिंग पटवे, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur: Leaked exam papers on WhatsApp; investigation underway.

Web Summary : Nagpur's 12th-grade Chemistry and Physics papers leaked via WhatsApp. Students are under investigation after a supervisor discovered the leak. Authorities are tracing the source and involvement, promising strict action against those responsible. An inquiry is ongoing.
टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपPoliceपोलिसEducationशिक्षण