नागरिकांनी काेविड लसीकरणाचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST2021-03-07T04:08:48+5:302021-03-07T04:08:48+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील सर्व प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय देवलापार व रामटेक उपजिल्हा रुग्णालयात काेविड लसीकरण ...

Citizens should benefit from cavid vaccination | नागरिकांनी काेविड लसीकरणाचा लाभ घ्यावा

नागरिकांनी काेविड लसीकरणाचा लाभ घ्यावा

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तालुक्यातील सर्व प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय देवलापार व रामटेक उपजिल्हा रुग्णालयात काेविड लसीकरण माेहिमेला प्रारंभ झाला आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील आजारग्रस्त रुग्णांचे लसीकरण केले जात आहे. या लसीकरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका प्रशासन व आराेग्य विभागाने केले आहे.

या माेहिमेंतर्गत नागरिकांनी लस घेतली आहे. यात काेणताही दुष्परिणाम नाही. लस सुरक्षित आहे. काेणत्याही अफवा व अपप्रचारांना बळी न पडता नागरिकांनी प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात जाऊन लसीकरण करून घ्यावे. अधिक माहितीसाठी जवळच्या आराेग्य कर्मचारी, आशावर्कर यांच्याशी संपर्क साधावा. या लसीकरणासाठी ऑनलाईन नाेंदणी करणे गरजेचे आहे, यासाठी साेबत आधारकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, बँक पासबुक यापैकी काेणतेही कागदपत्र, माेबाईल क्रमांक तसेच रक्तदाब, मधुमेह किंवा इतर आजाराबाबत संबंधित पुरावा साेबत न्यावा आणि नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. हे लसीकरण माेफत असून, त्यासाठी काेणतेही शुल्क आकारले जात नाही. काेराेनापासून बचावासाठी प्रत्येकांनी आपल्या संपर्कातील व्यक्ती, मित्र व नातेवाईकांना याबाबत अवगत करावे व लसीकरणासाठी प्राेत्साहित करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के, खंडविकास अधिकारी प्रदीप बमनाेटे व तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार यांनी केले आहे.

Web Title: Citizens should benefit from cavid vaccination