शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत सखी मंचच्यावतीने ‘चिंग्स् का तडका’

By admin | Updated: June 13, 2014 01:30 IST

प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक येतो. पण प्रत्येक स्त्री सुगरण असतेच असे नाही. पण लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर कायम ती आपल्या कुटुंबासाठी चविष्ट आणि रूचकर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करीत असते असे म्हणतात.

नागपूर : प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक येतो. पण प्रत्येक स्त्री सुगरण असतेच असे नाही. पण लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर कायम ती आपल्या कुटुंबासाठी चविष्ट आणि रूचकर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करीत असते असे म्हणतात.
आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनापर्यंत पोचण्याचा मार्ग का पोटातून जातो नेमके हाच मंत्र समोर ठेवून प्रत्येक स्त्री संसारात आणि आपल्या स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थ तयार करून कुटुंबाचे मन जिंकते. यासाठी तिला पुष्कळदा बरीच मेहनत घ्यावी लागते. प्रयत्न करावे लागते. पण तिच्या या प्रामाणिक प्रयत्नांना खमंग तडका देण्यासाठी आणि तिच्या पदार्थांना आणखी लज्जतदार बनविण्यासाठी लोकमत सखी मंच व ‘चिंग्स् का तडका’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, १९ जून रोजी केले आहे. स्थानिक रजवाडा पॅलेस गांधीसागर तलाव महाल येथे हा कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शेफ हरपाल सिंग सोखी प्रत्यक्ष खास चिंग्स् का तडका युक्त लज्जतदार पाककृतींचे प्रात्यक्षिक दाखविणार आहे व काही खास टिप्स सखींना देणार आहे. अशा टिप्स ज्या प्रत्येक सखींना आपल्या स्वयंपाक घरात अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. तसे स्वयंपाकघर हा प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय याच जिव्हाळ्याने आणि प्रेमाने ती रोज काहीतरी नवीन पदार्थ कुटुंबासाठी करीत असते. पण प्रत्येक वेळेला तो पदार्थ रूचकर होईलच याची शाश्वती नसते. त्यामुळे रोज लज्जतदार चविष्ट पाककृती तयार करण्याचे आव्हान तिच्यासमोर उभे राहते त्यातल्या त्यात व्यक्ती तितक्या पाककृती याप्रमाणे प्रत्येकांच्या आवडीनुसार स्वयंपाक करणे म्हणजे फार मोठा प्रश्न. अशावेळेला ‘चिंग्स् का तडका’ या कार्यक्रमातून या सर्व प्रश्नांची उत्तरे महिलांना मिळणार आहे. अतिशय सोप्या सहज सुटसुटीत आणि लज्जतदार पाककृतींचा भरगच्च नजराणा म्हणजे चिंग्स् का तडका हा कार्यक्रम.
या कार्यक्रमाच्या रेसिपींच्या माहिती पुस्तिका भाग घेणाऱ्या प्रत्येक सखीला मिळणार आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या ८०० सखी मंच सदस्यांना प्रत्येकी १ याप्रमाणे पासेसस वितरित करण्यात येणार आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे आणि प्रथम या प्रथम सीट मिळवा याप्रमाणे प्रवेश देण्यात येणार आहे. नि:शुल्क पासेसकरिता सखीमंच कार्यालय, लोकमत भवन, रामदासपेठ येथे ९८५०३०४०३७ - २४२९३५५, मानेवाडा ९३२३८५४५३५, प्रतापनगर (गोपालनगर) ९४२३२४०००७, महाल ९८६००४२६३५ येथे संपर्क साधावा. कार्यक्रमाला येताना सखी मंच ओळखपत्र आणणे आवश्यक.(प्रतिनिधी)