शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

विनोदी बालनाट्यांच्या सादरीकरणात चिमुकले दंग

By admin | Updated: January 2, 2015 00:48 IST

राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बाल हौशी कलावंतांना प्रोत्साहित करणाऱ्या या स्पर्धेला विविध संस्थांचा भरघोस

राज्य बालनाट्य स्पर्धा : सकस सादरीकरणाने स्पर्धेचा समारोप नागपूर : राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बाल हौशी कलावंतांना प्रोत्साहित करणाऱ्या या स्पर्धेला विविध संस्थांचा भरघोस प्रतिसाद लाभला आणि बाल प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने या स्पर्धेला हजेरी लावली. ही स्पर्धा सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा समारोप विनोदी बालनाट्यांच्या सादरीकरणाने झाला. अखेरच्या दिवशी स्पर्धेत भट्टी, स्वप्नातला मूर्ख आणि आता बस झाले या तीन बालनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. बालपणीच्या विदारकतेचे ‘भट्टी’भट्टी हे बालनाट्य नवोदिता नाट्य संस्था, चंद्रपूरतर्फे सादर करण्यात आले. नाटकाचे लेखक संजय जीवने तर दिग्दर्शन डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांचे होते. दारूच्या भट्टीशी संलग्न बिजली, सोनू, गवत्या या कुटुंबीयांभोवतीचे हे कथानक अकाली हरविलेल्या बालपणाच्या विदारकतेचे चित्रण करणारे होते. भट्टीत काम करणाऱ्या मुलांना येणारे अनुभव आणि त्यांचे कोमेजणारे बालपण या बालनाट्यातून मांडण्यात आले. रसिकांना अंतर्मुख करणारे हे बालनाट्य होते. यात मयूर कोहळे, ओंकार वायचळ, बकुळ धवने यांनी भूमिका केल्या. तर नाटकाच्या तांत्रिक बाजू कुणाल ढोरे, अ‍ॅड. राहुल मेडपल्लीवार, गायत्री देशपांडे, मिथुन मित्रा, शीतल बैस, अश्विनी खोब्रागडे, बबिता उईके, मेघा श्रीराम, स्नेहा गर्गेलवार यांनी पाहिल्या. विनोदी अनुभूतीचे ‘स्वप्नातला मूर्ख’टिळकनगर महिला मंडळाच्या नाट्यरंगतर्फे निखळ विनोदी अनुभूतीचे दर्जेदार सादरीकरण असलेले ‘स्वप्नातला मूर्ख’ हे नाटक झाले. उपस्थितांनी या नाटकाचा आनंद घेतला. अकबर बादशहा आणि चतुर बिरबल यांच्यावरील कथानकाचे हे नाट्य निखळ हास्य निर्माण करणारे होते. यात आर्यन पालकर, ईशान देशपांडे, सागरिका लटी, सोनम जालान, तनया दिवाळे, अनन्या खटी, तन्वी डेग्वेकर, पार्थ डेग्वेकर, आश्लेषा बोकीनपल्लीवार यांच्या भूमिका होत्या.(प्रतिनिधी)