शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लाल मिरचीचा 'तिखटपणा' कायम : आवक कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:45 IST

यंदा जास्त पावसामुळे उत्पादन कमी झाल्याने लाल मिरचीच्या भावात वाढ होऊन जास्त ‘तिखट’ झाली आहे. गेल्या वर्षी लाल मिरचीचे भाव ८० ते ११० रुपये किलो होते. यावर्षी भाव १७० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत.

ठळक मुद्दे जानेवारी अखेरीस भाव कमी होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : यंदा जास्त पावसामुळे उत्पादन कमी झाल्याने लाल मिरचीच्या भावात वाढ होऊन जास्त ‘तिखट’ झाली आहे. हंगाम सुरू झाल्यानंतरही भाव कमी झालेले नाहीत. कोल्ड स्टोरेजमधील मिरची संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभी ग्राहकांना जास्त भावाने खरेदी करावी लागत आहे. कळमन्यात आवक कमीच आहे. गेल्या वर्षी लाल मिरचीचे भाव ८० ते ११० रुपये किलो होते. यावर्षी भाव १७० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत.सध्या कळमना बाजारात चिखली, बुलडाणा तसेच स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून आवक आहे. आंध्र प्रदेशातून जवळपास आठ हजार पोत्यांची आवक झाली आहे. पावसामुळे उत्पादन येण्यास उशीर झाला. मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातून येणारी लाल मिरची ओली आहे. डिसेंबरच्या दुसºया आठवड्यापासून आवक वाढण्याची शक्यता असून तोपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.मिरचीचे व्यापारी संजय वाधवानी यांनी सांगितले की, मध्य प्रदेशच्या काही भागातून मिरचीची आवक सुरू झाली आहे तर आंध्र प्रदेशातून मालाची आवक सुरू होण्यास सध्या उशीर आहे. तेथील बाजारात आवक सुरू झाली आहे. गुंटूरमध्ये भाव जास्त आहेत. जानेवारीपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता नाही.कोल्ड स्टोरेजमधील मिरचीचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. सध्या बाजारात मिरचीची मागणी वाढली आहे. त्या कारणामुळे किमतीत वाढ झाली आहे. डिसेंबरपर्यंत भाव कमी होणार नाहीत. पुढील महिन्यात मध्य प्रदेशातून लाल मिरचीची आवक वाढण्याची शक्यता आहे. ओली मिरची ८० ते १२० रुपये आणि सुकी मिरचीला १४० ते २०० रुपये भाव मिळत आहे. खम्मम आणि गुंटूर तेजा क्वालिटीला १६० ते १८० रुपये, ३३४ क्वालिटीला १२५ ते १५० रुपये भाव मिळत आहे.

टॅग्स :foodअन्नMarketबाजारnagpurनागपूर