शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
2
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
3
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
4
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
5
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
6
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
7
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
8
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
9
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
10
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
11
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
12
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
13
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
14
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
15
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
16
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
17
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
18
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
19
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
20
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू

By admin | Updated: June 17, 2014 00:45 IST

विजेची तार पडून असल्याची वारंवार माहिती देऊनही एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. एसएनडीएलच्या हलगर्जीपणामुळे एका सात वर्षांच्या बालकाचा करुण अंत झाला.

नागरिक संतप्त : एसएनडीएलमधील दोषींवर कारवाईची मागणी
नागपूर : विजेची तार पडून असल्याची वारंवार माहिती देऊनही एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. एसएनडीएलच्या हलगर्जीपणामुळे एका सात वर्षांच्या बालकाचा करुण अंत झाला. आदित्य धर्मपाल यादव असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे एसएनडीएल विरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
दूध विक्रेता धर्मपाल यादव यांचा परिवार आरबीआय अधिकारी वसाहतीजवळ राहातो. त्यांना सात वर्षांचा आदित्य आणि नऊ वर्षांची मिनू ही मुले. धर्मपाल यांचे नातेवाईक बाजूलाच काही अंतरावर राहतात. चुणचुणीत आदित्य यादव परिवारातील सर्वांचाच लाडका. त्यामुळे तो आपल्या सर्वच नातेवाईकांकडे जात येत होता. रविवारी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास आदित्य आपल्या आजीकडून चॉकलेट घेऊन घराकडे निघाला. अधिकारी वसाहतीजवळ विजेची तार (अर्थिंग केबल) दोन दिवसांपासून तुटून पडली होती. त्याची एसएनडीएलच्या कार्यालयात सूचनाही देण्यात आली होती.
मात्र, नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणे दुर्लक्षित करणाऱ्या एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबींकडेही दुर्लक्ष केले. परिणामी ती केबल तशीच पडून राहिली. निरागस आदित्यला त्याची जाण नसल्यामुळे तो तारेच्या जवळून गेला.
संपर्क होताच आदित्यला जोरदार करंट लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत घटनास्थळी जमले. त्यांनी एसएनडीएलच्या कार्यालयात घटनेची माहिती कळवली. मात्र, बऱ्याच विलंबानंतर एसएनडीएलची मंडळी घटनास्थळी पोहचली. त्यामुळे शोकसंतप्त जमावाने एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा केला.
शोकाकूल वातावरणात आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळीही शोकसंतप्त जमावाने आदित्यच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या एसएनडीएलच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली.
सदर पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)