सावनेरच्या भाजीबाजारात चिक्कार गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:08 AM2021-04-19T04:08:39+5:302021-04-19T04:08:39+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने रात्रीला संचार तर दिवसा जमावबंदी लागू केली. एवढेच ...

Chikkar crowd at Savner's vegetable market | सावनेरच्या भाजीबाजारात चिक्कार गर्दी

सावनेरच्या भाजीबाजारात चिक्कार गर्दी

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने रात्रीला संचार तर दिवसा जमावबंदी लागू केली. एवढेच नव्हे तर जिल्हा प्रशासनाने साथराेग प्रतिबंध कायद्यान्वये जिल्ह्यातील आठवडी बाजारावर बंदीही घातली आहे. मात्र, सावनेर शहरातील भाजीबाजारात रविवारी (दि. १८) ग्राहकांनी चिक्कार गर्दी बघायला मिळाली. शहरातील मुख्य मार्गावर पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त असताना या भाजीबाजारात नागरिक काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचा फज्जा उडवित मुक्तसंचार करीत हाेते.

विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात सावनेर शहर व तालुका काेराेना संक्रमणामध्ये आघाडीवर आहे. काहींनी सर्व नियम धाब्यावर ठेवून शहरात मुक्तसंचार करायला सुरुवात केली आहे. त्यात काही काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. त्यातच शहरातील भाजीबाजारात अनेक विक्रेत्यांनी भाजीपाल्यासह इतर वस्तूंची दुकाने थाटली हाेती. ग्राहकांनीही खरेदी करण्यासाठी गर्दी केली हाेती. या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर या बाबी नावालाही दिसत नव्हत्या. त्यामुळे नागरिकांचा हा बेजबाबदारपणा काेराेना संक्रमणास अधिक कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केली.

काेराेना संक्रमणामुळे वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. गरिबांनी मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी पदरमाेड करून महागडे फाेन खरेदी केले. त्यातच ग्रामीण भागातील शिक्षणाचा बट्ट्याबाेळ झाला. अशी सर्व विपरित परिस्थिती असताना काही नागरिक त्यांचा बेजबाबदारपणा साेडायला तयार नाही. नांदाेगाेमुख व परिसरात काेराेना रुग्ण वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी स्थानिक माेवाडे पब्लिक स्कूलमध्ये साेय करावी, अशी मागणी सरपंच विवेक माेवाडे यांनी केली आहे. या शाळेकडे सात हजार चाैरस फूट क्षेत्रफळ असलेली इमारत आहे. तिथे डाॅक्टर, औषधे, ऑक्सिजन व १०० खाटांची साेय केल्यास अनेकांचे प्राण वाचविल्या जाऊ शकतात, असेही विवेक माेवाडे यांनी सांगितले असून, यासाठी आपण उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांना पत्र पाठविले असल्याचेही त्यांनी सांगितले.

...

उपचाराविना मृत्यू

ग्रामीण भागात काेराेनाचे संक्रमण वाढत आहे. बहुतांश गावांमध्ये अख्ख कुटुंब पाॅझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहेत. यात काहींचा उपचारादरम्यान तर काहींचा उपचाराविना मृत्यू झाला आहे. मृत्यूची ही साखळी आजही कायम आहे. काही नागरिक काेराेनाची लागण झाल्यानंतर डाॅक्टरांवर विश्वास ठेवण्याऐवजी गावठी इलाज करण्यावर भर देत जीव गमावत आहेत. काही नागरिकांचा डाॅक्टरांवर विश्वास असला तरी त्यांच्याकडे महागडी औषधे खरेदी करायला पैसा नाही. असे असतानाही नागरिक त्यांचा बेजबाबदारपणा साेडायला तयार नाहीत.

...

शाळेत उपचाराची साेय करा

तालुक्यातील नांदागोमुख व परिसरात काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. अनेकांवर शहरात अथवा दवाखान्यात उपचार करणे शक्य नसल्याने त्यांच्यावर नांदागाेमुख येथील शाळेत उपचाराची सुविधा करावी, अशी मागणी सरपंच विवेक ऊर्फ जगदीश मोवाडे यांनी केली आहे. खासगी हाॅस्पिटलमधील उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर आहे. शहरांमधील शासकीय रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे गावात उपचाराची साेय निर्माण करणे आवश्यक असल्याचेही विवेक माेवाडे यांनी सांगितले.

Web Title: Chikkar crowd at Savner's vegetable market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.