शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

चिखली प्रकल्प सिंचनामध्ये ‘फेल’

By admin | Updated: April 28, 2016 03:03 IST

चिखली नाल्यावर ४३ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प तयार करण्यात आला. या प्रकल्पाची सिंचनक्षमता १८०० एकर एवढी ....

११०० एकरात पोहोचले नाही पाणी : ४३ कोटींचा खर्च पाण्यातंंविजय कडू काटोलचिखली नाल्यावर ४३ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प तयार करण्यात आला. या प्रकल्पाची सिंचनक्षमता १८०० एकर एवढी असताना केवळ ७०० एकरातच प्रकल्पाचे पाणी पोहोचले. परिणामी हा प्रकल्प सिंचनामध्ये ‘फेल’ झाल्याचे वास्तवचित्र असून शेतकऱ्यांमध्ये मात्र कमालीचा संताप आहे. चिखली नाला प्रकल्पाला १९९३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पाद्वारे चिखली, येनवा, मोहखेडी, कलंभा, येरला (धोटे), वंडली (सावरकर) अशा सहा गावांच्या परिसरातील १८०० एकरमध्ये सिंचन होणे अपेक्षित होते. परंतु कालव्याची कामे पूर्ण करण्यात न आल्याने आजमितीस केवळ ७०० एकर ओलीत होत आहे. या प्रकल्पाच्या अपूर्ण कालव्याचा फटका वंडली, मसलीसह इतर गावांना बसला आहे. या प्रकल्पाची लांबी १५९२ मीटर आहे. दरवर्षी पावसाळ्यात प्रकल्प पूर्ण भरतो. मात्र हिवाळ्यानंतर ओलितासाठी नियोजन नसल्याने या प्रकल्पातील पाण्याचा पाहिजे तसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. चिखली प्रकल्पातील पाणी केवळ सिंचनासाठी अपेक्षित होते. मात्र नरखेडसह सावरगाव येथे पाणीटंचाई असल्याने विशेष बाब म्हणून १५ वर्षांपूर्वी या धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले. चिखली ते नरखेड हे अंतर २२ किमी असून सद्यस्थितीत येथूनच नरखेडला पाणीपुरवठा होत आहे. पाईपलाईनमुळे पाणी वितरणात अनेक अडचणी निर्माण होतात. दुसरीकडे, नरखेडपासून अवघ्या पाच किमी अंतरावर पिंपळगाव (वखाजी) येथे धरण बांधण्यात आले. त्या धरणापर्यंत जुनी पाईपलाईन आहे. चिखली धरणाऐवजी त्या धरणावरून नरखेडला पाणीपुरवठा केल्यास पाणी वितरणाचा खर्च बऱ्याच अंशी कमी होईल. सोबतच चिखली प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी मिळून सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होईल. परंतु त्याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. प्रकल्पाचा फायदा काय?प्रकल्पाचा आराखडा तयार करताना रेल्वे मार्ग पार करून कालवा न्यायचा आहे, हे माहिती होते. असे असताना त्याचा विचार न करता काम सुरू झाले. मात्र त्यानंतर रेल्वे क्रॉसिंगपुढे साडेनऊ किमी अंतराच्या कालव्याचे कामच पूर्ण झाले नाही. त्यामुळे आजही १८०० पैकी ११०० एकर जमीन सिंचनापासून वंचित आहे. धरण पूर्ण होऊन शेतकऱ्यांना ओलितासाठीच पाणी मिळत नसेल तर या धरणाचा फायदा काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली जात आहे. कालव्याच्या कामात अडथळाबुडीत क्षेत्रात येणाऱ्या इसापूरचे पुनर्वसन करून तेथे धरणाचे काम पूर्ण झाले. मात्र मुख्य कालव्याचे काम करताना या कामात काटोल-नरखेड रेल्वे मार्ग येत असल्याने रेल्वे क्रॉसिंगपर्यंत काम करण्यात ठरले. रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे भिष्णूरपर्यंत या धरणाचे पाणी पोहोचविण्यासाठी लघु मध्यम प्रकल्प विभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे निधीची मागणी केली. रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे कालवा नेण्यासाठी रेल्वे विभागाकडे दोन कोटी रुपये भरायचे आहे. त्याची मागणी केली असता मध्यम प्रकल्प विभागाने रेल्वे क्रॉसिंगपर्यंत कालव्याचे काम का पूर्ण झाले नाही, अशी विचारणा केली हे विशेष!