शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

By admin | Updated: July 1, 2015 03:11 IST

महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या २०६ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी तसेच अंगणवाडीला पुरविण्यात आलेल्या ...

राष्ट्रवादी युवक काँग्रेस : व्हेरायटी चौकात धरणे आंदोलन नागपूर : महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या २०६ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी तसेच अंगणवाडीला पुरविण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या मालाचा विरोध राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. राज्य शासनातील मंत्र्यांचे घोटाळे नऊ महिन्यातच बाहेर येत असून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. जनतेच्या या फसवणुकीची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकात धरणे आंदोलनात केली. पंकजा मुंडे यांच्या विरोधात नारे देत त्यांनी मंत्रिपदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष विशाल खांडेकर यांनी यावेळी केली. याप्रसंगी संतप्त कार्यकर्त्यांनी चक्का जाम करण्याचाही प्रयत्न केला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्वरित न्यायिक आयोग स्थापन करून पंकजा मुंडे यांची चौकशी करावी आणि चौकशीचा अहवाल येईपर्यंत पंकजा मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी आणि नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. भाजपने नऊ महिन्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराची सीमा पार केली आहे. यानंतर चार वर्षाचा कालावधी असून या काळात भाजप जनतेची किती लूट करणार, हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. नैतिकतेच्या आधारावर सामान्य जनतेची फसवणूक करून निवडून आलेला भाजपाने जनतेची लूट चालविली आहे. पंकजा मुंडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराने हे उघडच झाले आहे. त्यामुळे न्यायिक आयोग स्थापन करावा आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार करावे, अशी जोरदार मागणी करीत कार्यकर्त्यांनी भाजप आणि पंकजा मुंडे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. हे आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल खांडेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर, राजू नागुलवार, ईश्वर बाळबुधे, मोंटी गंडेचा, संतोषसिंग, रम्ज सिद्धीकी, मयूर उमरकर, अशरफ खान, शेखर पाटील, शैलेश पांडे, रोशन भिमटे, मोहम्मद जुनेद, अमोल लारोकर, अमोल खडगी, पिंटू मेश्राम, राजू भोतमांगे, राहुल खेडकर, प्रकाश लांजेवार, राजू सरवर, प्रफुल्ल खेडकर, प्रवीण मेश्राम, रिंकी नायडू, जावेद शेख, योगेश पिल्ले आणि लखन पाटील आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)