शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
2
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
3
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
4
मुनव्वर फारुकीने केला दुसरा निकाह? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; दुसरी पत्नी कोण?
5
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडली गेली...
6
हृदयद्रावक! एक आठवड्यापूर्वीच झालेलं लग्न; राजकोट गेमिंग झोन आगीत पती-पत्नीचा मृत्यू
7
भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली
8
“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला
9
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी
10
सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण
11
इमरान हाश्मी नव्हता 'मर्डर'साठी पहिली पसंती, या अभिनेत्याची झाली होती निवड
12
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
13
पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली चिंता
14
SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...
15
Sensex पहिल्यांदाच ७६ हजार पार, निफ्टीनंही रचला इतिहास; निवडणूक निकालांपूर्वी VIX ५% वाढला
16
"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
17
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरानं वाढवली सराफा बाजारातली गरमी, घसरणीनंतर पुन्हा वाढले दर
18
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
19
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
20
Anurag Thakur : "काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं"; अनुराग ठाकूर कडाडले

छत्तीसगडच्या बुकींची नागपुरात येऊन सट्टेबाजी

By योगेश पांडे | Published: May 02, 2024 12:24 PM

Nagpur : हॉटेलमधून सुरू होती लगवाडी-खायवाडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्तीसगडमधून नागपुरात येत येथील हॉटेलमध्ये बसून सट्टेबाजीचे रॅकेट चालविणाऱ्या बुकींना अटक करण्यात आली आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. १० दिवसांपासून नागपुरात ही टोळी आली होती व आयपीएलच्या सामन्यांवर लगवाडी-खायवाडी सुरू होती.

सतनामी हॉटेल येथील बी.टी.पी. हॉटेल येथे पोलिसांनी ही कारवाई केली. या हॉटेलमध्ये आयपीएलवर सट्टा सुरू असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. पोलिसांनी तेथील ४०५ क्रमांकाच्या खोलीत धाड घातली असता तेथे टीव्हीवर सामना सुरू होता व तीन जण फोनच्या माध्यमातून बेटिंग स्वीकारत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी अजय विजय सोनी (३०, कोरबा, छत्तीसगड), विनय निलकमल वर्मा (कोरबा, छत्तीसगड) व तरंग पवन अग्रवाल (कोरबा, छत्तीसगड) यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता हरीष केसरवानी (४५, कोरबा, छत्तीसगड) व हॉटेल संचालक उमेश शेंडे (आंबेडकर चौक, वर्धमाननगर) यांच्या मदतीने बेटिंगचे रॅकेट सुरू असल्याची त्यांनी कबुली दिली. मागील १० दिवसांपासून आरोपी हॉटेलमधून हे रॅकेट चालवत होते. त्यांच्याजवळून टीव्ही, महागडा लॅपटॉप, ३ महागडे मोबाईल, कार असा १४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात लकडगंज पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव जाधव, साईनाथ रामोळ, संदीप शिंदे, सुखदेव गिरडकर, आनंद मरस्कोल्हे, शकील शेख, मयुर बन्सोड, स्वप्नील तांदुळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरChhattisgarhछत्तीसगड