Join us  

Sensex पहिल्यांदाच ७६ हजार पार, निफ्टीनंही रचला इतिहास; निवडणूक निकालांपूर्वी VIX ५% वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 3:24 PM

Share Market Mid-day Mood:  बँकिंग आणि आयटी शेअर्समधील खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीनं आज २७ मे रोजी नवे विक्रम प्रस्थापित केले. दुपारी दोन्ही निर्देशांकांनी आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर मजल मारली.

Share Market Mid-day Mood:  बँकिंग आणि आयटी शेअर्समधील खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीनं आज २७ मे रोजी नवे विक्रम प्रस्थापित केले. दुपारी दोन्ही निर्देशांकांनी आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर मजल मारली. निफ्टी शेअर्समध्ये सर्वात जास्त फायदा डिव्हिस लॅब्सला झाला. कंपनीचा हा शेअर जवळपास ४ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता.  

डिव्हिस लॅब्सचे मार्च तिमाहीचे निकाल शेअर बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगले असल्याने अनेक विश्लेषकांनी या शेअरच्या टार्गेट प्राइसमध्ये वाढ केली आहे. याशिवाय एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि एल अँड टी या कंपन्यांचे शेअर्सही निफ्टीत सर्वाधिक वधारले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.६ टक्क्यांनी तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ०.१ टक्क्यांनी वधारला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी बाजारातील अस्थिरताही वाढली आहे. दुपारच्या सुमारास इंडिया व्हीआयएक्स निर्देशांक ५.३ टक्क्यांनी वधारून २२.९ अंकांवर पोहोचला. दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांनी सेन्सेक्स ५५३ अंकांनी वधारून ७५,९६४ वर तर निफ्टी १४० अंकांनी वधारून २३,०९७ वर व्यवहार करत होता. दुपारच्या सत्रात शेअर बाजार ५९९ अकांनी वधारुन ७६००९.६८ वर गेला. सुमारे १,५८८ शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर १,८१० शेअर्स घसरले आणि ११९ शेअर्स स्थिर राहिले.

टॅग्स :शेअर बाजार