Join us  

इमरान हाश्मी नव्हता 'मर्डर'साठी पहिली पसंती, या अभिनेत्याची झाली होती निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 3:06 PM

Murder Movie : २००४ साली रिलीज झालेल्या 'मर्डर' चित्रपटाने इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावतला रातोरात स्टार बनविले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसू यांनी केले होते.

२००४ साली रिलीज झालेल्या 'मर्डर' (Murder Movie) चित्रपटाने इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि मल्लिका शेरावत(Mallika Sherawat)ला रातोरात स्टार बनविले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसू यांनी केले होते. या चित्रपटाचे निर्माते मुकेश भट होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण 'मर्डर' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. फार कमी लोकांना माहित असेल की 'मर्डर' चित्रपटासाठी इमरान हाश्मी नव्हे तर रजनीश दुग्गलची पहिली पसंती होती.

सिद्धार्थ कननने नुकतेच रजनीश दुग्गलची मुलाखत घेतली. यावेळी रजनीशने 'मर्डर' चित्रपटाची ऑफर का नाकारली, यामागचे कारण सांगितले. तो म्हणाला की, मार्च, २००३मध्ये मिस्टर इंडियाचा किताब जिंकला होता. तिसऱ्या दिवशी मला एका चित्रपटाची ऑफर आली. १० दिवसांपूर्वीची गोष्ट अशी की, मुंबईतील एका रिसॉर्टमध्ये स्पर्धा सुरू होती. एके दिवशी महेश भट सर आले. त्यांनी प्रत्येकाची नावे विचारली आणि इथे का आलात हे देखील विचारले. प्रत्येकजण आपापली नावे सांगत होता, माझी पाळी आली तेव्हा मी उभा राहिलो आणि म्हणालो माझे नाव रजनीश दुग्गल आहे. मी दिल्लीचा आहे आणि मी इथे जिंकण्यासाठी आलो आहे. मला वाटते कदाचित ते माझ्या या गोष्टीने प्रभावित झाले असतील.

ऑफिसमध्ये बोलवून दिली सिनेमाची ऑफरमिस्टर इंडिया जिंकल्यानंतर रजनीश दुग्गलला निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये बोलावण्यात आले. तो म्हणाला, 'जेव्हा मी ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा मुकेश भट म्हणाले की मी एक चित्रपट बनवत आहे. ते मला लायब्ररीत घेऊन गेले. इमरान हाश्मी आणि आफताब शिवदासानी यांच्या फूटपाथचे पोस्टर होते. ते म्हणाला की हा माझा पुतण्या आहे, मी त्याला पुन्हा लॉन्च करत आहे. त्यांनी मला कथा सांगितली. त्यांनी सांगितले की ते या चित्रपटात एका नवीन मुलीला कास्ट करत आहे, तिचे नाव आहे रीमा गिल (मलायका शेरावत). त्यांनी माझ्यासाठी चित्रपटातील गाणी ऐकवली, जी खूप अप्रतिम होती.

का नाकारला चित्रपट?रजनीश दुग्गल म्हणाला, 'ते म्हणाले की, चित्रपटात पतीची भूमिका आहे आणि प्रियकराची भूमिका आहे. तू कोणती भूमिका करणार आहेस ते सांग. त्या चित्रपटात खूप इंटिमेट सीन्स होते. मी म्हणालो सर मी स्क्रीनवर किस करणार नाही. कारण माझी गर्लफ्रेंड आहे. आता आमचे लग्न झाले. तेव्हा आम्ही दोघे डेटिंग करत होतो. त्यांनी माझ्या निर्णयाचा आदर केला आणि समजून घेतले. अशातच रजनीश दुग्गलने प्रेयसीमुळे ‘मर्डर’ चित्रपट नाकारला होता. यानंतर रजनीश दुग्गलने २००८ मध्ये विक्रम भटच्या १९२० या चित्रपटातून पदार्पण केले.

टॅग्स :इमरान हाश्मी