Join us  

मुनव्वर फारुकीने केला दुसरा निकाह? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; दुसरी पत्नी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 3:26 PM

मुनव्वर फारुकी त्याच्या रिलेशनशिपमुळे नेहमी चर्चेत असतो.

'बिग बॉस 17' चा विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) त्याच्या रिलेशनशिपमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याचं एक लग्न झालं असून त्याला मुलगाही आहे. शिवाय त्याची  एक गर्लफ्रेंडही होती. बिग बॉसमध्येही त्याच्या रिलेशनशिपचीच चर्चा असायची. आता मुनव्वरने दुसरं लग्न केल्याची चर्चा आहे. अभिनेत्री हिना खानने फोटो शेअर करत हिंट दिली आहे.

मुनव्वर सध्या रुग्णालयात असल्याचं त्याच्या पोस्टवरुन दिसून आलं होतं. त्याला नक्की काय झालंय हे मात्र त्याने स्पष्ट केलं नाही. तर आता अचानक त्याच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, मुनव्वरचा १० दिवसांपूर्वीच निकाह झाल्याचं बोललं जात आहे. त्याचे जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवारच निकाहासाठी उपस्थित होते. रिपोर्टमध्ये सूत्राच्या हवाल्याने असेही म्हणण्यात आले आहे की, त्याला हे आत्ताच कुठेही उघड होऊ द्यायचं नाही. त्याच्या पत्नीसोबतचा फोटोही कोणालाच मिळणार नाही. तर दुसरीकडे मुनव्वरच्या टीमकडून  अद्याप  काहीच अधिकृत सांगण्यात आलेले नाही. 

सोशल मीडियावर चर्चा आहे की मुनव्वरने जिच्याशी निकाह केला तिचं नाव महजबी कोटवाला आहे. ती मेकअप आर्टिस्ट आहे. गुपचूप त्यांचा निकाह पार पडला मात्र 26 मे ला आयटीसी ग्रँड मराठामध्ये रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती. या रिसेप्शन पार्टीत हिना खानही सहभागी झाली होती. हिना आणि मुनव्वर जवळचे मित्र आहेत. त्यांनी एका म्युझिक अल्बममध्ये काम केलं आहे. 

मुनव्वरची पहिली पत्नी जॅस्मिनसोबत त्याचा २०२२ मध्येच घटस्फोट झाला असल्याचीही माहिती आहे. 'बिग बॉस 17' मध्ये आयेशा खानने मुनव्वरच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. आयेशा त्याला डेट करत होती तेव्हा तो आणखी एका मुलीला डेट करत असल्याचं तिला कळालं होतं. 

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजनलग्न