नागपुरात बँक मॅनेजरला घातला ६.९० लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 08:54 PM2021-11-12T20:54:47+5:302021-11-12T20:55:39+5:30

Nagpur News नागपुरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरला अज्ञात व्यक्तीने फोन करून पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यानुसार पैसे पाठविल्यानंतर हा प्रकार बनावट असल्याचे उघडकीला आले.

Cheated Bank manager for Rs 6.90 lakh in Nagpur | नागपुरात बँक मॅनेजरला घातला ६.९० लाखांना गंडा

नागपुरात बँक मॅनेजरला घातला ६.९० लाखांना गंडा

googlenewsNext

नागपूर : बेलतरोडी ठाण्याच्या परिसरात बँक मॅनेजरला ६.९० लाखांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. रंजितकुमार वर्मा, बेलतरोडीच्या स्टेट बँक ऑफ इंडियात मॅनेजर आहेत.

त्यांना १० नोव्हेंबरला अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्याने आपण ताजश्री ऑटो व्हिल्स प्रा. लिमिटेडचा संचालक असल्याचे सांगितले. त्याने मेडिकल इमर्जन्सी असल्याची बतावणी करून वर्मा यांना हिमांशू चौधरी नावाच्या व्यक्तीच्या खात्यात ६ लाख ९० हजार ६७० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्याने चेक देण्यास असमर्थता दाखवून हिमांशू चौधरीच्या खात्यात आरटीजीएस करण्यास सांगितले.

वर्माने आरोपींना अर्ज ई-मेल करण्यास सांगितले. त्यावर आरोपीने वर्मा यांना ई-मेल पाठविल्याचे सांगितले. परंतु, नेटवर्कची समस्या असल्यामुळे ई-मेल डिलिव्हर होत नसल्याची बतावणी केली. आरोपीने वर्मा यांना व्हॉट्सॲपवर बनावर ताजश्री ऑटो व्हिल्स प्रा.लि.चा बनावट अर्ज पाठविला. त्या आधारे वर्मा यांनी हिमांशू चौधरीच्या खात्यात ६ लाख ९० हजार ६७० रुपये ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर वर्मा यांना आपली फसवणूक झाल्याची शंका आली. त्यांनी त्वरित बँकेला सूचना देऊन हिमांशू चौधरीच्या खात्यातून रक्कम न देण्यास सांगितले. परंतु, तोपर्यंत कथित हिमांशू चौधरीने पैसे काढले होते.

वर्मा यांनी ताजश्री ऑटो व्हिल्स प्रा.लि.च्या संचालकांची चौकशी केली असता त्यांनी फोन आणि पैसे ट्रान्सफर केल्यास सांगितले नसल्याची माहिती दिली. त्यानंतर, वर्मा यांनी बेलतरोडी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फोन करणारे, हिमांशू चौधरीचा शोध घेत आहेत. बँक अधिका-याच्या भूमिकेमुळेही पोलीस चक्रावले आहेत.

 

Web Title: Cheated Bank manager for Rs 6.90 lakh in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.