शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
2
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
3
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
4
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
6
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
7
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
8
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
9
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
10
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
11
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
12
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
13
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
14
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
15
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
16
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
17
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
18
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
19
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
20
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
Daily Top 2Weekly Top 5

समर्पित कार्यकर्त्यांचे चरित्र समोर यावे

By admin | Updated: October 10, 2016 02:29 IST

आज भाजपा सत्तेत असली तरी या यशाचा पाया असंख्य कार्यकर्त्यांनी रचलेला आहे. जनसंघापासून सुरू

नागपूर : आज भाजपा सत्तेत असली तरी या यशाचा पाया असंख्य कार्यकर्त्यांनी रचलेला आहे. जनसंघापासून सुरू झालेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला. अनेकांनी आपल्या समर्पित वृत्तीने आदर्श प्रस्थापित केला. सुंदरलालजी राय हेदेखील त्यातीलच होते. अशा सेवाभावी कार्यकर्त्यांचे चरित्र समाजासमोर आणले पाहिजे, असे मत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केले. सुंदरलालजी राय जन्मशताब्दी समारोहाचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, अनुपम राय व डॉ. रुपा राय हे उपस्थित होते. पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी राय यांच्या जन्मशताब्दीला रविवारपासून सुरुवात होत आहे. दोन्हीही नेत्यांचे कार्य समाजासाठी आजही प्रेरणादायी आहे. दोघांचेही आयुष्य कमी होते, पण काम मोठे होते. त्यामुळे आयुष्य किती जगले यापेक्षा कसे जगले याला महत्त्व असते, असे प्रतिपादन राम नाईक यांनी केले. पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी यांच्या कार्यात साम्य आहे. संघर्षातून यांनी कामाला सुरुवात केली. प्रसंगी विरोध व उपहास यांचा सामना केला व जनसंघाचा पाया रचला. देशात ४५० राजकीय पक्ष आहेत. त्यातील ४४५ पक्ष कुठल्या ना कुठल्या कुटुंबाचे आहेत. विचारांवर आधारित व सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला मोठे करण्याचे काम याच समर्पित भावनेने केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुंदरलाल राय यांच्या सारख्यांनी संघर्ष केला म्हणून आज आजचे सत्तेचे दिवस आम्हाला पहायला मिळाले. त्यांचा इतिहास नवीन पिढीसमोर समर्पक पद्धतीने आणण्याची आवश्यकता आहे. हा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी यांनी सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्र निर्माणासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यांच्या कार्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी जन्मशताब्दी समितीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल सोले यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर डॉ.रुपा राय यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी राय यांच्या जन्मशताब्दी सोहळ््याच्या उद््घाटनप्रसंगी विचार व्यक्त करताना उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक. मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, डॉ. रुपा राय व अनुपम राय उपस्थित होते.