शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर, गडचिरोली ठरेल भाजपच्या विजयाचा शिल्पकार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST

चंद्रपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात नागपूर नंतर चंद्रपूर आहे. चंद्रपूर, गडचिरोली हे दोन्ही जिल्हे भाजपचा गड आहेत. पदवीधर मतदारसंघातील ...

चंद्रपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात नागपूर नंतर चंद्रपूर आहे. चंद्रपूर, गडचिरोली हे दोन्ही जिल्हे भाजपचा गड आहेत. पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार हे दोन्ही जिल्हे ठरतील, असा विश्वास माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, खोरिपचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, गडचांदूर, राजुरा आदी ठिकाणी विजय संकल्प मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी उमेदवार संदीप जोशी, भाजप जिल्ह्या अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा उपस्थित होते. अहीर यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला किमान २० मतदारांपर्यंत पोहचून भाजपचा विजय सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. विविध ठिकाणच्या मेळाव्याला खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, बल्लारपूर नगराध्यक्ष हरीश शर्मा, सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, जि.प. सदस्य योगिता डबले, पं. स. सभापती अल्का आत्राम, समीर केणे, युवा मोर्चा अध्यक्ष आशिष देवतळे, जि.प. सदस्य संतोष तंगडपल्लीवर, पं. स.सदस्य रावजी बोलीवर, शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, सतीश बोम्मवार, माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष बबन निकोडे, गणपती चौधरी, प्राचार्य निखाडे, दीपक सातपुते, गजानन गोरंटीवार, नीलेश संगमवार, नीलेश पुलगमकर आदी उपस्थित होते.

भाजपच्या विजयासाठी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक कार्यकर्ता मतदारांपर्यंत पोहचत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला भरघोस साथ मिळेल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दिला.