शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून केंद्रीय कार्यालयांकडून अडवणूक

By admin | Updated: June 27, 2014 00:36 IST

राज्य शासनाच्या प्राधिकृत यंत्रणेकडून देण्यात आलेली प्रमाणपत्रे ही केंद्रीय प्राधिकरणासाठी स्वीकारार्ह असताना काही केंद्रीय प्राधिकरणातील अधिकारी केंद्राच्या ‘फॉर्मेट’नुसारच प्रमाणपत्राची मागणी करीत

नागपूर: राज्य शासनाच्या प्राधिकृत यंत्रणेकडून देण्यात आलेली प्रमाणपत्रे ही केंद्रीय प्राधिकरणासाठी स्वीकारार्ह असताना काही केंद्रीय प्राधिकरणातील अधिकारी केंद्राच्या ‘फॉर्मेट’नुसारच प्रमाणपत्राची मागणी करीत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.अलीकडेच रेल्वे आणि केंद्रीय पोलीस दलाच्या भरतीच्या वेळी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांच्या बाबतीत हा प्रकार घडला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सादर केलेल्या प्रमाणपत्रावर संबंधित अधिकाऱ्याने आक्षेप घेऊन त्यांना केंद्राच्या ‘फॉर्मेट’मध्ये जात प्रमाणपत्राची मागणी केली होती. हे येथे उल्लेखनीय.राज्य शासनातर्फे ठरवून दिलेल्या प्रपत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रातून जात प्रमाणपत्रे दिली जातात. ही देताना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या सर्व नियमांची पूर्तता केली जाते. राज्य शासनाच्या सर्व प्राधिकरणात ती स्वीकारली जातात. यापूर्वी केंद्रीय कार्यालयात व तेथील नोकर भरतीच्या वेळी ती नाकारली जात नव्हती. मात्र यंदा केंद्राचे काही प्राधिकरणे ती स्वीकारत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जात प्रमाणपत्रे केंद्राच्याच ‘फॉर्मेट’मध्ये ती असावी असा त्यांचा आग्रह असतो.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जात प्रमाणपत्रासंदर्भात केंद्र सरकारने केलेल्या नियम आणि निकषाचा आधार घेऊनच राज्य शासनाने जात प्रमाणपत्राचा ‘फॉर्मेट’ तयार केला असून तो सगणात टाकला आहे. यात केंद्र सरकारने २०११ पर्यंत केलेल्या सर्व दुरुस्तींचा समावेश आहे. मात्र केंद्र सरकारच्या ‘फॉर्मेट’मध्ये २००१ पर्यंतच्याच दुरुस्तीचा समावेश आहे. त्यामुळे दोन्ही प्रमाणपत्रात थोडा फरक आहे. पण राज्य शासनाने दिलेले प्रमाणपत्र हे सर्वत्र लागू पडते. असे असतानाही रेल्वे व केंद्रीय पोलीस भरतीच्या वेळी अनेक उमेदवारांचे जात प्रमाणपत्र नाकारण्यात आल्याने त्यांची मोठी धावपळ उडाली होती. प्रमाणपत्रात बदल करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला नाही. त्यामुळे उमेदवार अडचणीत सापडले होते. त्यांची वणवण सुरू होती. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयानेच याबाबत तोडगा काढला. मात्र हा प्रश्न सध्या निकाली निघाला असला तरी भविष्यात पुन्हा निर्माण होणार नाही याबाबत साशंक ता आहे. (प्रतिनिधी)