शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

विशेष चौकशी पथकास आव्हान

By admin | Updated: March 1, 2016 02:47 IST

राज्य शासनाच्या गृह विभागाने शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.

शिष्यवृत्ती घोटाळा : हायकोर्टाची शासनाला नोटीसनागपूर : राज्य शासनाच्या गृह विभागाने शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. यासंदर्भात १५ जानेवारी २०१६ रोजी जीआर जारी करण्यात आला आहे. या निर्णयाला बुलडाणा जिल्ह्यातील कटई बहुउद्देशीय संस्थान व बुलडाणा सोशल अ‍ॅन्ड स्पोर्टस् वेलफेअर असोसिएशन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे.याचिकाकर्ते २०११-१२ पासून मोटाळा व जालना येथे विविध व्यावसायिक अभ्यासक्रम चालवित आहेत. शासनातर्फे एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. केंद्र शासनाने शिष्यवृत्ती देण्यासाठी नियम ठरविले आहेत. तसेच राज्य शासनाने दिशानिर्देश जारी केले आहेत. विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. गडचिरोली जिल्ह्यात शिष्यवृत्तीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. असाच गैरव्यवहार राज्यभर झाला असण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने विशेष चौकशी पथक स्थापन केले आहे. पथकात अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व विशेष पथक), समाज कल्याण आयुक्त व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश आहे. हा निर्णय व्यवसाय नियमाच्या विरोधात आहे. अधिकाराचा दुरुपयोग करून निर्णय घेण्यात आलाय, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रदीप देशमुख यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून १० मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सतीश ताळेकर व अ‍ॅड. ओ. डी. अहमद यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)