शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राऊ त होणार स्थायी समितीचे अध्यक्ष!

By admin | Updated: February 11, 2016 03:30 IST

महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी परिवहन समितीचे सभापती सुधीर राऊ त यांची निवड केली जाणार आहे.

शुक्रवारी घोषणा : भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत होणार निर्णयनागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी परिवहन समितीचे सभापती सुधीर राऊ त यांची निवड केली जाणार आहे. शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु भाजपमध्ये ऐनवेळी नावात बदल होण्याची परंपरा सुरू झाल्याने घोषणा झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत महापौर प्रवीण दटके यांचे नाव निश्चित मानले जात होते. परंतु ऐनवेळी गिरीश व्यास यांना पक्षाची उमेदवारी देण्यात आली. तसेच आमदार कृष्णा खोपडे शहर अध्यक्षपदी कायम राहतील अशी चर्चा होती. परंतु आमदार सुधाकर कोहळे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. विशेष सभेनंतर बुधवारी दटके यांना स्थायी समिती अध्यक्षासंदर्भात विचारले असता याबाबतचा निर्णय कोर कमिटी घेणार असल्याचे सांगून त्यांनी माहिती देण्याचे टाळले. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नगरसेवक सुनील अग्रवाल, गिरीश देशमुख व नीता ठाकरे हेही इच्छूक आहे. सुनील अग्रवाल यांचे नाव सत्तापक्षनेतेपदासाठी निश्चित झाले होते. परंतु ऐनवेळी दयाशंकर तिवारी यांचे नाव पुढे आले होते. त्यामुळे अग्रवाल यांची समजूत काढण्यासाठी त्यांना स्थापत्य समितीचे सभापतिपद तर गिरीश देशमुख यांना कर संकलन समितीचे लागोपाठ दुसऱ्यांदा सभापती करण्यात आले. गेल्यावेळी नीता ठाकरे यांचे नाव स्थायी समिती अध्यक्षपदासाठी होते. परंतु त्यांना सदस्यपदावर समाधान मानावे लागले. (प्रतिनिधी)