शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

दाखले आता निश्चित दिवसातच मिळणार

By admin | Updated: July 12, 2015 03:11 IST

जात प्रमाणपत्रासह विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी आता शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाही.

लोकसेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी काढले अध्यादेश नागपूर : जात प्रमाणपत्रासह विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी आता शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाही. कारण ठरलेल्या दिवसांमध्ये हे दाखले नागरिकांना उपलब्ध करून देणे आता बंधनकारक राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य शासनाच्या लोकसेवा हक्क कायद्याची अंमलबाजवणी येत्या सोमवारपासून सुरू होत असून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी त्यासंबंधीचे अध्यादेश जारी केले आहेत. जातप्रमाणपत्र असो किंवा उत्पन्नाचा दाखला असो, ते मिळविणे सहज शक्य होत नाही. त्यासाठी एक तर दलालांची मदत घेऊन पैसे खर्च करावे लागतात किंवा वारंवार चकरा तरी माराव्या लागतात. नागरिकांचा हा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच सर्वात पहिला निर्णय लोकसेवा हक्क कायद्यासंदर्भात घेतला होता. त्याचे चांगले परिणाम आता दिसून आले आहे. लोकांची कामे तातडीने आणि वेळेत पूर्ण व्हावी, याच उद्देशाने नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे पदभार स्वीकारल्यापासून काम करीत आहेत. आता त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने त्यांनी अध्यादेश जारी केले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल कार्यालयांमार्फत नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अधिकारी अधिसूचित केले आहेत. या अधिसूचनेनुसार वय, अधिवास व राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र १५ दिवसात, जातीचे प्रमाणपत्र - २१ , उत्पन्न प्रमाणपत्र- १५, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र-२१, तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र -७, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र-७, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना- ७, अधिकार अभिलेखाची प्रमाणित प्रत-७, अल्पभूधारक दाखला-१५, अल्प भू-धारक दाखला- १५ , भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला -१५, शेतकरी असल्याचा दाखला १५, डोंगर, दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचा दाखला-७ प्रतिज्ञापत्र साक्षांकित करण-१ आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र व पात्र वारसांना प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र हस्तांतरित करण्यासाठी ३० दिवस निश्चित करण्यात आले आहे. या ठराविक कालमर्यादेत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र तयार करून न दिल्यास त्यांच्याविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. कोणत्या अधिकाऱ्याकडे अपील करावे, त्याची माहिती सुद्धा अधिसूचनेद्वारा देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)