मध्य रेल्वेची एका दिवसात १९९१ वॅगनची वाहतूक , ९.३ कोटींचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:50 IST2020-01-23T00:49:31+5:302020-01-23T00:50:38+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २१ जानेवारीला एकाच दिवशी ३९ रॅकसोबत १९९१ वॅगनची माल वाहतूक करण्याचा विक्रम केला आहे.

मध्य रेल्वेची एका दिवसात १९९१ वॅगनची वाहतूक , ९.३ कोटींचे उत्पन्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २१ जानेवारीला एकाच दिवशी ३९ रॅकसोबत १९९१ वॅगनची माल वाहतूक करण्याचा विक्रम केला आहे. यासोबतच आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये विभागाने माल वाहतुकीच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. यामुळे विभागाला एकाच दिवशी ९.३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न २६ नोव्हेंबर २०१९ च्या ३४ रॅक आणि १८७९ वॅगनची वाहतुक तसेच ७ डिसेंबर २०१९ च्या ३५ रॅकच्या तुलनेत सर्वाधिक आहे. याशिवाय विभागाने सर्वाधिक ९४ टक्के वेळेचे पालन केले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, विभागीय परिचालन व्यवस्थापक सुमित बदरके, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे ही मालवाहतूक करण्यात आली आहे.