शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

औषधाविना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया रखडल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:19 IST

नागपूर : गरीब रुग्णांसाठी आशेचे किरण असलेल्या मेयो, मेडिकलमध्ये औषधांचा ठणठणाट पडल्याने साध्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना पदरमोड करून ३०० ...

नागपूर : गरीब रुग्णांसाठी आशेचे किरण असलेल्या मेयो, मेडिकलमध्ये औषधांचा ठणठणाट पडल्याने साध्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना पदरमोड करून ३०० ते ४०० रुपयांचे औषध खरेदी करावे लागत आहे. केवळ याच शस्त्रक्रियेसाठी नाही तर रेटीना, तिरळेपणा, अश्रू ग्रंथी, नेत्रावरणावरील जाड भाग (प्टेरीजीअम) या सारख्या शस्त्रक्रियेसाठीही ‘आय ड्रॉप’, इंजेक्शनपासून ते मलमापर्यंत रुग्णांनाच साहित्य विकत आणावे लागत आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते औषध आणतात. परंतु नि:शुल्क शस्त्रक्रियाचे लाभार्थी असताना पैसे नसल्याने त्यांच्या शस्त्रक्रिया रखडत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा ठणठणाट आहे. औषध पुरवठ्याची जबाबदारी दिलेल्या ‘हाफकिन्स’ कंपनीकडून मागणीच्या तुलनेत फार कमी पुरवठा होत आहे. यामुळे स्थानिक पातळीवर कसेतरी औषधे विकत घेऊन रुग्णालयाचे कामकाज सुरू आहे. परंतु जीवनावश्यक औषधे खरेदीवर भर दिला जात असल्याने नेत्ररोग विभागाला लागणारी औषधे मागे पडली आहे. परिणामी, मागील काही महिन्यांपासून मेयो व मेडिकलमधील नेत्ररोग विभाग आधी औषधी नंतरच शस्त्रक्रिया हे धोरण राबवित असल्याचे चित्र आहे.

-औषधांची अशीही जमावाजमव

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) रोज नेत्राशी संबंधित १० ते १५ शस्त्रक्रिया तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागात रोज २० ते २५ शस्त्रक्रिया होतात. औषधे नसली तरी डॉक्टर रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज समजून सांगत असल्याने रुग्ण पदरमोड करून औषध विकत घेतात. परंतु अनेक रुग्णांकडे तेवढेही पैसे राहत नसल्याने ते शस्त्रक्रियेपासून वंचित राहतात. काही निवासी डॉक्टर स्वत:कडून औषधी खरेदी करून देतात तर काही, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हकडून मिळालेल्या सॅम्पलमधील औषधे उपलब्ध करून देत आहेत. औषधांची ही जमवाजमव कधी पर्यंत चालणार, असा प्रश्न येथील डॉक्टरांना पडला आहे.

-वृद्ध व दारिद्र्य रेषेखालील रुग्णांनाही फटका

मेयो, मेडिकलमध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया या मोतीबिंदूचा होतात. यातील ९० टक्के शस्त्रक्रिया या जेष्ठ नागरिक व दारिद्र्यरेषेखालल रुग्णांवर होतात. शासनाच्या नियमानुसार या रुग्णांना मोफत औषधे मिळणे अपेक्षित असतानाही ‘फ्लरबीप्रोफेन’, ‘हॅमोट्रोपिन’, ‘ट्रोपिकामाइड प्लस’ आदी आय ड्रॉप, ‘हायपोसल’, ‘डेक्सा’ हे डोळ्यात टाकणारे मलम, ‘क्लोरमफेनिकॉल’, ‘पॉलीमॅक्सीन बी’ हे तोंडावाटे देणारे प्रतिजैविक औषधे व इंजेक्शन ‘ट्रिपॅन ब्लू’ या औषधे बाहेरुन खरेदी करावे लागत आहे.