शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता समितीला खडसावले

By admin | Updated: February 18, 2015 02:49 IST

एखाद्याला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याच्या रक्ताच्या नात्यातील दुसऱ्या व्यक्तीचा समान जात वैधतेचा दावा नाकारला जाऊ शकत नाही.

नागपूर : एखाद्याला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याच्या रक्ताच्या नात्यातील दुसऱ्या व्यक्तीचा समान जात वैधतेचा दावा नाकारला जाऊ शकत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही जात वैधता पडताळणी समितीचे अधिकारी बिनडोकपणे वागून एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना वेगवेगळे निकष लावत आहेत. अकोला विभागीय जात वैधता पडताळणी समितीला याचा जोरदार फटका बसला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीचे अध्यक्ष व सदस्यांना व्यक्तिश: बोलावून कडक शब्दांत खडसावले. समिती अध्यक्ष एच.पी. तुमोड व सदस्य भीमराव खंडाते न्यायालयात उपस्थित झाले होते. दुसऱ्या सदस्य प्राजक्ता इंगळे रुग्णालयात भरती असल्यामुळे येऊ शकल्या नाहीत. एखाद्याने बनावट दस्तावेजाच्या आधारे मिळविलेले वैधता प्रमाणपत्र नाकारले जाऊ शकते, पण वैध प्रमाणपत्राचा उचित सन्मान झाला पाहिजे. परंतु, समिती विवेकबुद्धीला वेशीबाहेर सोडून मुलाला वैधता प्रमाणपत्र देताना वडिलाच्या वैधता प्रमाणपत्राकडे दुर्लक्ष करीत आहे. हा सामान्य व्यक्तींचा मानसिक छळ करण्याचा प्रकार आहे. अधिकार व कर्तव्य हातात हात टाकून चालायला हवे हे कोणीच विसरू नये, असे मत न्यायालयाने समितीला फटकारताना नोंदविले. समिती पदाधिकाऱ्यांनी न्यायालयासमक्ष प्रतिज्ञापत्र सादर करून बिनशर्त क्षमा मागितली. तसेच, यापुढे अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली. यामुळे न्यायालयाने अधिकाऱ्यांना क्षमा करून सरकारी वकिलाला या आदेशाची प्रत सर्व जात वैधता पडताळणी समितींकडे पाठविण्याची सूचना केली. अकोला समितीने राजपूत भामटा (विमुक्त जाती) जातीचा दावा फेटाळल्यामुळे बुलडाणा येथील आशिष सोळंकी, सिद्धेश्वर मोरे व प्राजक्ता गायकवाड यांनी उच्च न्यायालयात वेगवेगळ्या रिट याचिका दाखल केल्या होत्या. मोरे यांच्या चुलत भावाला, गायकवाड यांच्या वडिलाला, तर सोळंकी यांच्या सख्ख्या बहिणीला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. परंतु, या तिघांना वैधता प्रमाणपत्र नाकारण्यात आले होते. यामुळे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दोन आठवड्यांत वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देतानाच समितीला समन्स बजावला होता. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. एन. बी. काळवाघे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)