शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
6
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
7
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
8
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
9
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
10
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
11
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
12
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
13
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
14
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
15
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
16
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
17
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
18
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
19
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
20
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Daily Top 2Weekly Top 5

खापरखेड्यात कॅसिनो चालकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:10 IST

खापरखेडा : खापरखेडा शहरातील मुख्य बाजारपेठेत बुधवारी रात्री कॅसिनो चालकाची हत्या करण्यात आली. प्रशांत घोडेस्वार (३०) रा. वॉर्ड क्रमांक ...

खापरखेडा : खापरखेडा शहरातील मुख्य बाजारपेठेत बुधवारी रात्री कॅसिनो चालकाची हत्या करण्यात आली. प्रशांत घोडेस्वार (३०) रा. वॉर्ड क्रमांक ४, खापरखेडा असे मृताचे नाव आहे. रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास झालेल्या या थरारक हत्याकांडामुळे खापरखेडा शहरातील कायदा व सुवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत घोडेस्वार याचे जागेच्या वादावरून घटनेच्या अर्ध्या तासापूर्वी एका व्यक्तीसोबत भांडण झाले. यानंतर रात्री ९.४५ वाजच्या सुमारास मुख्य मार्ग बाजारपेठ परिसरातील मोहन किराणा स्टोअरसमोर चार जणांनी त्याला गाठले. यातील एका बुरखाधारी आरोपीने त्याच्यावर चाकूने वार केले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी तिथून पसार झाले. हा थरार पाहून बाजारपेठेतील घाबरलेल्या दुकानदारांनी तातडीने शटर बंद केले. घटनास्थळाच्या बाजूलाच राजबाबा रेस्टॉरेंट आणि बार आहे. या बारच्या बाहेरील सीसीटीव्हीत हा थरार कैद झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तिघांची ओळख पटविली आहे. मात्र मुख्य आरोपी कोण, याचा अद्याप शोध लागलेला नाही. आरोपींच्या शोधासाठी खापरखेडा पोलीस आणि गुन्हे शाखेची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.