शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहामुळे संपले बलात्काराचे प्रकरण

By admin | Updated: April 20, 2016 03:26 IST

तक्रारकर्ती महिला व आरोपीने विवाह केल्यामुळे बलात्काराचे प्रकरण संपविण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित एफआयआर रद्द करून या दाम्पत्याला दिलासा दिला आहे.

हायकोर्टाचा दिलासा : सुखी कौटुंबिक जीवनासाठी एफआयआर रद्दनागपूर : तक्रारकर्ती महिला व आरोपीने विवाह केल्यामुळे बलात्काराचे प्रकरण संपविण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित एफआयआर रद्द करून या दाम्पत्याला दिलासा दिला आहे.१७ आॅक्टोबर २०१५ रोजी महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ४२०, ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदविला होता. तक्रारकर्ती महिला व आरोपी जवळचे नातेवाईक आहेत. महिलेचे हे तिसरे लग्न होय. २०११ मध्ये तिने पहिले लग्न केले होते. पहिल्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यानंतर तिने दुसरे लग्न केले. पोलीस तक्रारीनुसार, आरोपीने महिलेच्या चारित्र्यावरून दुसऱ्या नवऱ्याचे कान भरले होते. यामुळे दुसऱ्या नवऱ्यानेही तिला घटस्फोट दिला. यानंतर आरोपीने लग्नाचे आमीष देऊन तिच्यासोबत जवळीक साधली. तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. वासना पूर्ण झाल्यावर आरोपीने लग्नास नकार दिला. परिणामी महिलेने पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविला होता.पोलिसांची चौकशी सुरू झाल्यानंतर आरोपी व महिलेने सामंजस्याने वाद मिटवून लग्न केले. त्यांना एक मुलगीही झाली आहे. दोघेही आनंदात राहात आहेत. ‘एफआयआर’मुळे त्यांच्या संसारात अडथळे निर्माण होत होते. परिणामी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी दोघांच्या सुखी संसारासाठी व प्रकरणातील तथ्ये लक्षात घेता एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला. यावेळी आरोपी व महिलेचा भाऊ न्यायालयात उपस्थित होते. पोलिसांनी चौकशी करून आरोपी व तक्रारकर्त्या महिलेने लग्न केल्याची माहिती न्यायालयाला दिली होती.(प्रतिनिधी)