शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

कार्टेल तुपाशी एमआयएल उपाशी!

By admin | Updated: February 5, 2015 01:14 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन करणारी मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ही कंपनी विमानतळावर आणि बाहेरील दर्शनी भागात लावलेल्या

नियमांचे उल्लंघन : महसुली उत्पन्नात घटनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन करणारी मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ही कंपनी विमानतळावर आणि बाहेरील दर्शनी भागात लावलेल्या जाहिरातींच्या अटी व नियमांचे सपशेल उल्लंघन करणाऱ्या कंपनीवर एवढी मेहरबान का, असा प्रश्न जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञांना पडला आहे. यामुळे ‘एमआयएल’ला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. विमानतळावर जाहिरातीचे सिनेजेस, बोर्ड आणि होर्डिंग लावण्याचे कंत्राट कार्टेल आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टर्स या कंपनीला आॅक्टोबर २०१३ मध्ये देण्यात आले. निविदेच्या कागदपत्रांमध्ये ‘एमआयएल’ने प्रत्येक बोर्ड, रस्त्याच्या बाजूकडील सिनेजेस, होर्डिंग आणि तंतोतंत आकाराचा उल्लेख केला आहे. एमआयएने कार्टेल कंपनीला जवळपास ७ हजार चौरस फूट जागा जाहिरातींचे १०९ सिनेजेस, बिलबोर्ड आणि होर्डिंग टर्मिनल इमारतीच्या आत आणि बाहेर तसेच प्राईड हॉटेलसमोरील टी-पॉर्इंटपासून विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर लावण्यास परवानगी दिली आहे. त्यावेळी हे संपूर्ण कंत्राट दरमहा १२.५० लाख रुपयांचे होते. नियमांचे सपशेल उल्लंघनकार्टेल कंपनीने पुन्हा नवीन जागा शोधून तिथे जाहिराती लावण्याची परवानगी ‘एमआयएल’कडे मागितली. ‘एमआयएल’ने यावर वेगळ्या निविदा न मागविता कार्टेल कंपनीला जुन्या दरानेच जाहिराती लावण्याची परवानगी दिली. त्यामुळे कार्टेल आता दरमहा मूळ १२.५० लाख रुपयांऐवजी १५ लाख रुपयांचा भरणा करीत आहे. येथे ‘एमआयएल’चे महसुली उत्पन्न वाढल्याचे दिसून येते. पण खरी बोंब अशी आहे की, ‘एमआयएल’ने जाहिरात कंपनीला एका कराराद्वारे बिल बोर्डाचे आकार आणि संख्या वाढवून दिली आहे. विमानतळावर जाहिराती लावण्यासाठी दरवर्षी निविदा मागविल्या तर ‘एमआयएल’ला दर महिन्याला मिळणाऱ्या १५ लाख रुपयांऐवजी अनेक पटीने महसूल मिळू शकतो. ‘एमआयएल’च्या उत्पन्नात घट होत असल्याचे माहीत असतानाही ‘एमआयएल’ ही ‘कार्टेल जाहिरात कंपनीला मुक्तहस्ते सूट देत आहे.