शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याचा करुण अंत

By admin | Updated: April 19, 2016 06:26 IST

खेळता खेळता विहिरीत पडल्यामुळे १६ महिन्याच्या चिमुकल्याचा करुण अंत झाला. रविवारी सायंकाळी प्रतापनगर

नागपूर : खेळता खेळता विहिरीत पडल्यामुळे १६ महिन्याच्या चिमुकल्याचा करुण अंत झाला. रविवारी सायंकाळी प्रतापनगर तिसरा बसथांबा (गोपालनगर) जवळ ही घटना घडली. भावेश नरेश राजनकर (वय १६ महिने) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. नरेश माणिकराव राजनकर (वय २५) हे लोकसेवा नगरात राहतात. ते एका केस कर्तनालयात काम करतात.घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांची पत्नी धुणी भांड्याचे काम करते. अशा वेळी घरी चिमुकल्या भावेशला कुणी सांभाळायला नसल्याने नरेश राजनकर त्याला आपल्या सोबत घेऊन केस कर्तनालयात जात होते.नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास राजनकर भावेशला खेळवत असताना दुकानात एक ग्राहक आले. त्यामुळे त्यांनी भावेशला खाली खेळायला सोडले. ते ग्राहकाचे केस कापत असताना चिमुकला भावेश खेळता खेळता बाजूला असलेल्या वानखेडेच्या विहिरीजवळ गेला आणि विहिरीत पडला. ग्राहकाचे काम संपल्यानंतर राजनकर भावेशला शोधू लागले. १५ ते २० मिनिटे इकडे तिकडे शोधल्यानंतर त्यांनी विहिरीत बघितले तेव्हा विहिरीत भावेश पडून दिसला. त्यांनी प्रतापनगर पोलिसांना कळविले. उपनिरीक्षक के. आर. घोडवे यांनी लगेच अग्निशमन दलाला पाचारण केले. भावेशला बाहेर काढून मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी चिमुकल्या भावेशला मृत घोषित केले. या घटनेमुळे राजनकर दाम्पत्याला जबर मानसिक धक्का बसला असून परिसरातही तीव्र शोककळा पसरली आहे.(प्रतिनिधी)राजनकर दाम्पत्याचे विश्वच हरवले राजनकर दाम्पत्याने प्रेमविवाह केला होता. त्यामुळे दोघांच्याही नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. परिणामी सर्व नातेवाईक असूनही राजनकर दाम्पत्य कौटुंबिक सुखापासून दुरावले होते. १६ महिन्यांपूर्वी भावेशचा जन्म झाल्यापासून राजनकर दाम्पत्याच्या जीवनातील एकाकीपणा दूर झाला होता. भावेशच त्यांच्यासाठी सर्वकाही होता. त्यामुळे हे दोघेही त्याला आलटून-पालटून सोबतच ठेवत होते. रविवारी पत्नी कामावर गेल्यामुळे नरेश राजनकरने भावेशला दुकानात आणले. पाच-दहा मिनिटात ग्राहकाचे काम आटोपेल आणि भावेशला पुन्हा जवळ घेईल, अशा बेताने राजनकरने त्याला खाली सोडले होते. अशी भयंकर घटना घडेल, असा विचार स्वप्नातही राजनकर दाम्पत्याने केला नव्हता. या घटनेने राजनकर दाम्पत्याचे विश्वच हरवले आहे.