शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

राष्ट्रभाषा सभेकडील भूखंडाची लीज रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:59 AM

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला दिलेल्या भूखंडाची लीज रद्द करण्यात यावी अशा विनंतीसह सिटिझन फोरम फॉर ईक्वॅलिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयात याचिका : राज्य सरकारसह इतरांना मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला दिलेल्या भूखंडाची लीज रद्द करण्यात यावी अशा विनंतीसह सिटिझन फोरम फॉर ईक्वॅलिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिकेतील सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे.याचिकेतील प्रतिवादींमध्ये नगर विकास विभागाचे सचिव, मुख्यमंत्री, नगर रचना संचालक, नगर रचना उपसंचालक, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, मनपा आयुक्त, नासुप्रचे सभापती, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, सभेचे उपाध्यक्ष गिरीश गांधी, प्राजक्ता डेव्हलपर्स, एसएमजी हॉस्पिटल्स कंपनी, एसएमजी कंपनीचे अध्यक्ष दत्ता मेघे, संचालक सागर मेघे, वोक्हार्ट हॉस्पिटल्स कंपनी व सीबीआय संचालक यांचा समावेश आहे. सभेला नागपूर सुधार प्रन्यासने शंकरनगर येथील भूखंड लीजवर दिला आहे. हा लीज करार रद्द करण्यासाठी कुकडे यांनी सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. ७ सप्टेंबर २०१६ रोजी उच्च न्यायालयाने लीज रद्द करण्याचा आदेश देण्यास नकार दिला. त्यामुळे कुकडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रंजन गोगोई व आर. भानुमती यांच्यासमक्ष सुनावणी झाली.राष्ट्रभाषा सभेला नासुप्रने १९६१ मध्ये शंकरनगर येथील १.२ एकरचा भूखंड ३० वर्षांसाठी लीजवर दिला होता. १९९१ मध्ये लीजचे नूतनीकरण करण्यात आले. त्यानंतर सभेने १९९९ मध्ये या भूखंडावर दोन इमारती बांधण्यासाठी प्राजक्ता डेव्हलपर्ससोबत करार केला. त्यानुसार दोन इमारती बांधण्यात आल्या. पहिल्या इमारतीत सभेचे कार्यालय व सभागृहे आहेत तर, दुसऱ्या इमारतीचा व्यावसायिक उपयोग करण्यात येत आहे. सध्या दुसºया इमारतीत वोक्हार्ट रुग्णालय कार्यरत आहे. ही कृती अवैध आहे. त्यामुळे सभेसोबतचा लीज करार रद्द करण्यात यावा असे कुकडे यांचे म्हणणे आहे. कुकडे यांच्यावतीने अ‍ॅड. सुधीर वोडितेल व अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयnagpurनागपूर