मामेभावाला भेटायला बोलावले.. लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध संपवण्यासाठी पतीसोबत मिळून केली प्रियकराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:03 IST2026-03-06T17:02:30+5:302026-03-06T17:03:18+5:30

Nagpur : लग्नापूर्वीचा प्रियकर वारंवार त्रास देत असल्याने पती व पत्नीने त्याची चाकूने वार करून नागरिकांसमोर भरदिवसा हत्या केली. मृत प्रियकर हा आरोपी पत्नीचा मामेभाऊ असल्याची माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली.

Called to meet her maternal uncle's son.. She killed her lover along with her husband to end their premarital affair | मामेभावाला भेटायला बोलावले.. लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध संपवण्यासाठी पतीसोबत मिळून केली प्रियकराची हत्या

Called to meet her maternal uncle's son.. She killed her lover along with her husband to end their premarital affair

लोकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा :
लग्नापूर्वीचा प्रियकर वारंवार त्रास देत असल्याने पती व पत्नीने त्याची चाकूने वार करून नागरिकांसमोर भरदिवसा हत्या केली. मृत प्रियकर हा आरोपी पत्नीचा मामेभाऊ असल्याची माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली. तो पुण्यात नोकरी करायचा व होळीनिमित्त गावी आला होता. ही घटना खापरखेडा-कोराडी मंदिर मार्गालगत गुरुवारी (दि. ५) सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली.

सागर वानखेडे, रा. येरला (पावडे), ता. नरखेड असे मृताचे नाव असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजू गजभिये व त्याची पत्नी सोनालीचा समावेश आहे. दोघेही वॉर्ड क्रमांक-२, खापरखेडा, ता. सावनेर येथील रहिवासी असून, त्यांना दोन मुले आहेत. सागर हा राजूच्या पत्नीचा मामेभाऊ असून, दोघांनीही सोबत शिक्षण घेतल्याने त्यांचे आपसात प्रेमसंबंध होते. तिचा विवाह राजू गजभियेसोबत झाल्यानंतरही सागर तिच्या संपर्कात होता. होळी असल्याने सागर त्याच्या मूळ गावी येरला (पावडे) येथे आला होता. तो गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तिला भेटण्यासाठी खापरखेडा येथे आला होता.

तसा मेसेज त्याने तिला इन्स्टाग्रामवर पाठविला होता. वॉर्ड क्रमांक-२ मधील मंगल कार्यालयाजवळ ती सागरच्या मोटारसायकलवर मागे बसली आणि दोघेही खापरखेडा-कोराडी मंदिर मार्गावर आले. पती राजू मुलांना शाळेत सोडून दिल्यानंतर त्या दोघांच्या मागे आला. त्यानंतर पती-पत्नीने सागरवर चाकूने वार करून त्याची हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि सागरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविला. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास कोराडी (ता. कामठी) पोलिसांकडे वर्ग केला.

पर्स उचलण्यासाठी दुचाकी थांबवली अन्...

या मार्गावरील कोलार नदीवर असलेला पूल ओलांडताच तिने मुद्दाम पर्स खाली टाकली आणि पर्स उचलण्यासाठी सागरला मोटारसायकल थांबवायला लावली. तिने त्या पर्समध्ये घरून चाकू आणला होता. ती दुचाकीवरून खाली उतरली, पर्समधून चाकू काढून सागरवर वार केले. त्याच वेळी राजू तिथे पोहोचला व त्यानेही त्याच चाकूने त्याच्यावर चार वार केले. या मार्गाने येणारे-जाणारे हा प्रकार बघत होते. काहींनी याची मोबाइल फोनमध्ये व्हिडीओ क्लिप तयार केली. राजूच्या हातात चाकू असल्याने कुणीही मध्ये जाण्याचे धाडस केले नाही.

मुलांना जिवे मारण्याची धमकी

सागर आपल्या पत्नीला लग्नानंतर वारंवार त्रास देत असल्याची तक्रार राजूने खापरखेडा पोलिस ठाण्यात यापूर्वीच केली होती. ती काही दिवसांपूर्वी पुण्यात सागरकडे गेली होती. तेव्हा सागरने तिला दारूच्या नशेत मारहाण केली होती. तिने या घटनेची पुण्यातील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्यानंतरही दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. सागर तिच्यावर पुण्यात येण्यासाठी दबाव टाकत होता. त्यासाठी त्याने तिच्या दोन्ही मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

पाच मिनिटांची चुकामूक

राजू व त्याची पत्नी सागरला मारत असल्याची माहिती मिळताच ठाणेदार हरीश रूमकर यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ते घटनास्थळाजवळ पोहोचण्यापूर्वी दोघेही घरी निघून गेले. घरून ते पोलिस ठाण्याच्या दिशेने गेले. ठाण्याजवळ पोलिसांना दिसताच दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्याकडील चाकू जप्त केला. त्या दोघांनीही सागरची हत्या केल्याची कबुली दिली. घटनास्थळ कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तपास त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला.


 

Web Title : पत्नी और पति ने मिलकर पूर्व प्रेमी की हत्या की

Web Summary : पत्नी और पति ने पत्नी के चचेरे भाई की दिनदहाड़े हत्या कर दी, जो उसका पूर्व प्रेमी था। दंपति लगातार उत्पीड़न से तंग आ चुके थे। हत्या खापरखेड़ा-कोराडी रोड के पास हुई। पुलिस ने दंपति को गिरफ्तार कर हत्या में इस्तेमाल हथियार जब्त कर लिया।

Web Title : Jealous husband, wife murder her cousin for ending premarital affair.

Web Summary : A husband and wife murdered the wife's cousin, her former lover, in broad daylight. The couple was tired of the constant harassment. The murder occurred near Khaparkheda-Koradi road. Police arrested the couple and seized the murder weapon.