शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकास मारहाण करून लुटले

By admin | Updated: April 28, 2016 03:02 IST

लग्नसमारंभ आटोपून पारशिवनीला मोटरसायकलने येत असलेल्या व्यावसायिकाला पाच तरुणांनी वाटेत अडविले.

साहित्य हिसकावले : पालोरा शिवारातील घटनापारशिवनी : लग्नसमारंभ आटोपून पारशिवनीला मोटरसायकलने येत असलेल्या व्यावसायिकाला पाच तरुणांनी वाटेत अडविले. त्यांना जबर मारहाण करून त्यांच्याकडील मोटरसायकल, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ५३ हजार १५० रुपये किमतचा मुद्देमाल हिसकावून त्यांनी पळ काढला. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दतील नयाकुंड-पालोरा शिवारात शुक्रवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली. उत्तम वडस्कर रा. पारशिवनी, असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. वडस्कर हे लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी चिचभुवन येथे गेले होते. लग्न आटोपल्यानंतर ते त्यांच्या दुकानात नोकरी करणाऱ्या सचिन कडू नामक तरुणासोबत मोटरसायकलने पारशिवनी यायला निघाले. दरम्यान, नयाकुंड ते पालोरा दरम्यानच्या पेंच नदीचा पूल ओलांडताच त्याच्या मागून मोटरसायकलने आलेल्या चार ते पाच तरुणांपैकी एकाने त्यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार केला. परिणामी, दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते खाली कोसळले. त्यातच या तरुणांनी त्यांच्याजवळील ५० हजार रुपये किमतीची मोटरसायकल, तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल हॅण्डसेट व १५० रुपये रोख असा एकूण ५३ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला. त्यांच्यावर पारशिवनी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हा हल्ला सुनियोजित असल्याचा आरोप वडस्कर यांनी केला असून, आपल्याला जीवे मारण्याचा कट असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)