शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

नागपुरात ठिकठिकाणी टायर जाळून व्यक्त केला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 8:32 PM

भीमा कोरेगावमध्ये भीम सैनिकांवर सोमवारी झालेल्या दगडफेकीचे नागपुरात सलग दुसऱ्या   दिवशीही तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने बुधवारी विविध भागात मोर्चे, रॅली काढून घोषणाबाजी करीत टायर जाळले. काही रस्ता अडवून धरला. तर काही भागात दगडफेकही झाली. मात्र, शहरात चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे अनुचित घटना घडली नाही.

ठळक मुद्देनिषेध, घोषणाबाजी : रस्ताही अडवला : अनेक भागात तणाव

आॅनलाईन लोकमतनागपूर : भीमा कोरेगावमध्ये भीम सैनिकांवर सोमवारी झालेल्या दगडफेकीचे नागपुरात सलग दुसऱ्या   दिवशीही तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने बुधवारी विविध भागात मोर्चे, रॅली काढून घोषणाबाजी करीत टायर जाळले. काही रस्ता अडवून धरला. तर काही भागात दगडफेकही झाली. मात्र, शहरात चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे अनुचित घटना घडली नाही.भीमा कोरेगावमधील सोमवारच्या घटनेची माहिती कळाल्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच नागपुरातील वातावरण गरम झाले. भीमसैनिकांवर दगडफेक करणाऱ्यांवर  राष्ट्रद्रोह तसेच अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत तरुणांचे घोळके विविध भागात एकत्र होऊन घोषणाबाजी करीत आहे. मंगळवारी दुपारपासून जरीपटक्यातील भीम चौक, इंदोरा, कमाल चौकात टायर जाळून, बसवर दगडफेक करून जमावाने आपला रोष व्यक्त करीत आहेत. बुधवारी सकाळी विविध भागात मोर्चे, रॅली, टायरची जाळण्याचे प्रकार सुरू झाले. वाडी, इंदोरा, शताब्दी चौक, भीमचौक, मानेवाडा, इमामवाडा, जयताळा भागात मोठ्या संख्येत जमाव घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध नोंदवत होता. शताब्दी चौक आणि वाडीत जमाव आक्रमक होत असल्याचे पाहून पोलसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारांची समजूत काढत परिस्थिती हाताळली. काही ठिकाणी जमावाने रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाला.दरम्यान, मंगळवारी रात्री विविध भागात तणाव वाढत असल्याचे पाहून बुधवारी सकाळपासूनच पोलिसांचा शहरातील महत्त्वाची ठिकाणं आणि संवेदनशिल भागात प्रचंड ताफा तैनात करण्यात आला होता. मदतीला राखीव दलाच्या तुकड्यांही बोलवून घेतले होते. तणाव किंवा आंदोलकांशी बाचाबाची होत असल्याचे पाहून वरिष्ठ अधिकारी लगेच घटनास्थळी पहचून परिस्थीती हाताळत होते.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद