शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

अंत्यसंस्काराला गेलेल्या महिलेकडे घरफोडी, सीसीटीव्हीमुळे चोर पोलिसांच्या हाती

By योगेश पांडे | Updated: August 30, 2023 15:00 IST

१.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : नातेवाईकांकडे अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या एका महिलेकडे घरफोडी करणाऱया चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्याचा शोध लागला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

२० ऑगस्ट रोजी कल्पना हरीश्चंद्र घोडे (५२, सोमवारी क्वॉर्टर) या कुटुंबियांसह नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी मुळगावी गेल्या होत्या. त्यानंतर अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून बेडरूममधील सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख ४० हजार असा एकूण १.९५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. सक्करदरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. ते फुटेज तसेच इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या आधारे रितेश अश्वजित वानखेडे (१९ रामबाग, पाचनल चौक) याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने दोन अल्पवयीन साथीदारांसोबत घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, मोबाईल व दुचाकी असा १.४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आश्चर्याची बाब म्हणजे रितेशने घरफोडीदरम्यान वापरलेली दुचाकीदेखील ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे तपासादरम्यान  निष्पन्न झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीArrestअटकnagpurनागपूर