शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

सराफा बाजार कोलमडला

By admin | Updated: November 13, 2016 02:38 IST

सराफा व्यापाऱ्यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केल्यामुळे बाजारात शुकशुकाट आहे.

सोमवारपर्यंत बंद : ग्राहकांशी वाद नको : जुन्या नोटा स्वीकारणार नाहीनागपूर : सराफा व्यापाऱ्यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केल्यामुळे बाजारात शुकशुकाट आहे. ग्राहक सोने खरेदीसाठी जुन्या नोटा आणत असून ग्राहकांसोबत वाद नको म्हणून सराफांनी सोमवारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मोठीवगळता छोटी दुकाने शनिवारी सुरू होती, पण सोन्याची खरेदी-विक्री झाली नाही.नवीन नोटा चलनात येईपर्यंत अनेकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खरेदीसाठी केवायसी आणि पॅनची झेरॉक्स मागण्यात येत असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली आहे. सोना चांदी ओळ कमिटीचे अध्यक्ष रविकांत हरडे यांनी सांगितले की, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पाहता सोन्याची विक्री हजारात आणि लाखांत असते. अनेकांकडे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा आहेत. मोठी रक्कम बँकेत भरताना केवायसी वा पॅनकार्डची झेरॉक्स मागत आहे. झंझट नको म्हणून ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत, अशांनी सोने खरेदीचा निर्णय घेतला. निर्णयानंतर बुधवार, ९ नोव्हेंबरला ग्राहक मोठ्या प्रमाणात बाजारात आले. पण सराफांनी चलनातून बंद झालेल्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे अनेकांची निराशा झाली. व्यापारी नोटा स्वीकारत नसल्याचे माहीत झाल्यानंतर ग्राहक बाजारात फिरकले नाहीत. अनेक सराफांनी सोमवारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यवसाय सुरळीत होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे म्हणाले, ग्राहक काळ्या पैशाने सोने खरेदीसाठी बाजारात येत आहेत. जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी बाध्य करीत आहेत. ग्राहकांशी वाद नको म्हणून दुकाने बंद ठेवण्याचा सोपा मार्ग आम्ही स्वीकारला. ९ तारखेला अनेकांना केवायसी आणि पॅन कार्ड मागितले. पण त्यांनी देण्यास नकार दिला. याची माहिती ग्राहकांना झाल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून ग्राहक बाजारात आलेच नाही. मुबलक चलन बाजारात आल्यानंतर स्थिती पूर्ववत होईल. असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, ग्राहकांशी वाद नको म्हणून शोरूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नवीन नोटा चलनात आल्यानंतर दागिने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना तोपर्यंत वाट पाहावी लागेल. सोन्याच्या दागिन्यांची विक्री लाखांत असते. चलनातून बंद झालेल्या नोटा स्वीकारून सोन्याची विक्री करणे शक्य नाही. बाजारात शुकशुकाट होता. (प्रतिनिधी)सोने खरेदी-विक्री करणारे अडचणीतकेंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरच्या सायंकाळी जाहीर केल्यानंतर शासकीय अधिकारी आणि व्यावसायिकांचे धाबे दणाणले. पैसा बँकेत भरला तर आयकर आणि दंडाची आकारणी होण्याची भीती त्यांच्यात निर्माण झाली. आयकर अधिकाऱ्यांच्या त्रासापासून बचाव करण्याच्या दृष्टीने अनेकांनी सोन्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांच्या मानसिकतेचा फायदा घेत सराफांनी प्रति तोळा ३० हजारावर असलेल्या सोन्याची विक्री तब्बल ३८ आणि ४० हजार रुपये तोळ्यानुसार केली. जास्त भावाने सोने विकणाऱ्या सराफांची आयकर विभाग चौकशी करीत असल्याची माहिती आहे. ९ नोव्हेंबरला पहाटेपर्यंत काही सराफांची दुकाने सुरू ठेवून सोने आणि दागिन्यांची कोट्यवधींची विक्री केल्याची अधिकृत माहिती आहे. ग्राहकांची गर्दी झाल्यामुळे सराफांनी सोन्याचे भाव तोळ्यामागे तब्बल १० हजार रुपयांपर्यंत वाढविले. भाव वाढविल्यानंतरही ग्राहकांनी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ५०० आणि १०००च्या नोटा बंद झाल्यानंतरही सराफांनी त्या नोटा स्वीकारल्या. जास्त भाव दागिने खरेदी करणारे आणि विकणारे आयकर विभागाच्या रडारवर आले असून ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयकर विभागाने काही सराफा दुकानांची तपासणी केल्याची माहिती आहे.