रेल्वेस्थानकाची इमारत लवकरच पाडणार

By Admin | Updated: September 5, 2016 02:41 IST2016-09-05T02:41:32+5:302016-09-05T02:41:32+5:30

नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात विकासकामांना गती देण्यासाठी लवकरच जुनी ‘हमाल बिल्डिंग’ लवकरच पाडण्यात येणार आहे.

The building will soon be demolished | रेल्वेस्थानकाची इमारत लवकरच पाडणार

रेल्वेस्थानकाची इमारत लवकरच पाडणार

सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा : विकासकामांना येणार गती
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात विकासकामांना गती देण्यासाठी लवकरच जुनी ‘हमाल बिल्डिंग’ लवकरच पाडण्यात येणार आहे. हे काम २० सप्टेंबरपासून सुरूहोणार आहे.
‘हमाल बिल्डिंग’ जयस्तंभ चौकाजवळ मेनगेटला लागून आहे. या दोन मजली इमारतीत लोको रनिंग स्टाफची रेस्ट रुम, रेल्वे संघटनांचे कार्यालय आहेत. या कार्यालयांना यापूर्वी स्थानांतरित करण्यात आले आहे. परंतु लोको रनिंग स्टाफच्या रेस्ट रुमला स्थानांतरित करण्यावरून काही महिन्यांपासून ही इमारत पाडण्याचे काम रखडले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे मेल सर्व्हिस (आरएमएस) बिल्डींगमध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे कार्यालय आहे. ही जागा दोन हजार चौरसफुटांची आहे. या ठिकाणी ‘हमाल बिल्डिंग’च्या रनिंग लोको स्टाफच्या रेस्ट रुमला स्थानांतरित करण्याची योजना होती. परंतु संबंधित रेल्वे संघटनांनी जागा खाली करण्यास नकार दिला होता. यामुळे ‘हमाल बिल्डिंग’ पाडण्याचे काम अडकून पडले होते. परंतु आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या प्रशासनाने संबंधित संघटनांशी चर्चा करून त्यांची मंजुरी मिळविली असून २० सप्टेंबरला ही इमारत पाडण्याचे काम सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)

सर्व प्रकरणांचा निपटारा झाला
‘हमाल बिल्डिंग’ लवकरच पाडण्यात येणार आहे. आता रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील विकासकामांना गती येणार आहे. यामुळे कार्यालयाचे स्थानांतरण करण्याबाबतच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.’
बृजेश कुमार गुप्ता,
विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

Web Title: The building will soon be demolished