बिल्डरचा बँक आणि सदनिकाधारकांना फटका

By Admin | Updated: September 7, 2016 02:45 IST2016-09-07T02:45:26+5:302016-09-07T02:45:26+5:30

घेतलेल्या कर्जापोटी ३२ कोटींची परतफेड न करता बँकेला फटका देणाऱ्या तसेच निकृष्ट बांधकाम करून

Builder's bank and house holders hit | बिल्डरचा बँक आणि सदनिकाधारकांना फटका

बिल्डरचा बँक आणि सदनिकाधारकांना फटका

नागपूर : घेतलेल्या कर्जापोटी ३२ कोटींची परतफेड न करता बँकेला फटका देणाऱ्या तसेच निकृष्ट बांधकाम करून सदनिका धारकांची फसवणूक करणाऱ्या रामनाथ सिटी डेव्हलपमेंट प्रा. लि. च्या संचालकांसह तिघांविरुद्ध कोराडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सुभाषचंद्र गुप्ता, नरेश मुलतानी, एस. बी. गोसावी आणि एस. ई. गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. २०१२ मध्ये त्यांनी कोराडी परिसरात रामनाथ सिटी उभारण्याची घोषणा करून हुडको बँकेकडून कोट्यवधींचे कर्ज घेतले. त्यानंतर या कर्जाच्या रक्कमेपैकी बँकेकडे ३२ कोटींची रक्कम परत केली नाही. करारात नमूद असल्याप्रमाणे बांधकामाचा दर्जा न राखता निकृष्ट बांधकाम केले. त्यामुळे बँकेतर्फे पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी कोर्टात प्रकरण नेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, कोराडी पोलिसांनी प्रवीण नामदेवराव मडावी (वय ४५) यांच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक गोवारदीपे यांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: Builder's bank and house holders hit