शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-काँग्रेसच्या असंतुष्टांवर बसपाची नजर

By admin | Updated: January 12, 2017 01:54 IST

बहुजन समाज पार्टी (बसपा) महापलिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार असून यावेळी सुद्धा स्ट्रॅटेजीनुसार भाजपा-काँग्रेसमधील ज्येष्ठ असंतुष्टांवर बसपाची नजर आहे.

अद्याप पत्ते उघड नाही : सर्व जागा स्वबळावर लढणार नागपूर : बहुजन समाज पार्टी (बसपा) महापलिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार असून यावेळी सुद्धा स्ट्रॅटेजीनुसार भाजपा-काँग्रेसमधील ज्येष्ठ असंतुष्टांवर बसपाची नजर आहे. तसेच तिकिटांसाठी पक्षामध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बसपाने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाही. येत्या काही दिवसात बसपाच्या उमेदवारांच्या मुलाखतीलाही सुरुवात होईल. सध्या बसपाचे महापलिकेत १२ नगरसेवक आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. यावेळी बसपाने महापौर बनाओ अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यादृष्टीने प्रदेश अध्यक्ष विलास गरुड हे गेल्या दोन महिन्यांपासून परिश्रम घेत आहेत. मनपा निवडणुकीसाठी बसपाने पर्यवेक्षक व को-आॅर्डिनेटरची टीम तयार केली आहे. विधानसभा मतदार संघनिहाय ही टीम कार्यरत आहे. स्वच्छ प्रामाणिक चेहरा व हमखास निवडून येण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी (आर्थिक सक्षमतेसह) ज्या उमेदवाराकडे असतील अशा पदाधिकारी व कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले जाते. बसपाची सध्या कुणाशीही युती नाही. मात्र अलीकडेच भीमसेना या संघटनेने बसपाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचप्रकारे आणखी काही संघटना बसपासोबत येणार असल्याचे सांगितले जाते.(प्रतिनिधी) रविवारपासून मुलाखती राज्यभरातील नेते येणार येत्या १५ जानेवारी रोजी बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांचा वाढदिवस आहे. पक्षातर्फे त्यांचा वाढदिवस जनकल्याणकारी योजना दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त नागपुरात चंद्रमणी चौकात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, प्रभारी उपासक यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतरच मुलाखतीलाही सुरुवात होणार असल्याचे सांगितले जाते.