शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर वाढले

By admin | Updated: January 31, 2016 02:56 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयातर्फे २०१५ या एका वर्षात एकूण १७३ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली.

महसूल, पोलीस खाते आघाडीवर : वर्षभरात १७३ लाच प्रकरणे नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयातर्फे २०१५ या एका वर्षात एकूण १७३ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत सापळा प्रकरणांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे या वर्षातदेखील सर्वात जास्त लाच प्रकरणांत महसूल व पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी अडकले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१५ या वर्षभरातील लाच प्रकरणे, त्यात अडकलेले अधिकारी-कर्मचारी, झालेली कारवाई इत्यादीसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. यातून मिळालेल्या आकडेवारीनुसार भ्रष्टाचाराची वाढती प्रकरणे, लाच मागण्याचे वाढते प्रमाण यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढला आहे. २०१५ या वर्षात १७३ सापळा प्रकरणांमध्ये २०६ आरोपी अडकले. एकूण सापळ्यांत अडकलेल्यांमध्ये महसूल व पोलीस विभागातील प्रत्येकी ४० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेतील ३१ तर वनविभागातील १५ जणांचा समावेश आहे. वर्षभरात ६६ प्रकरणे निकाली निघाली तर १३ जणांना शिक्षा झाली.(प्रतिनिधी)‘क्लास वन’चे ११ अधिकारी सापळ्यात१ जानेवारी ते १७ डिसेंबर २०१५ या कालावधीत एकूण ११ ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात पोलीस दलातील २ तर जिल्हा परिषदेतील ४ अधिकारी आहेत. दुसऱ्या श्रेणीतील २० अधिकाऱ्यांना लाच प्रकरणात पकडण्यात आले. सर्वात कमी म्हणजे ७ कर्मचारी हे चतुर्थ श्रेणीतील निघाले.२ वर्षांत १३६ टक्क्यांची वाढ२०१४ या वर्षात एकूण १५४ सापळा प्रकरणे झाली होती व यात १९७ आरोपी सापडले होते. २०१५ मध्ये हाच आकडा १७३ प्रकरणे व २०६ आरोपी इतका गेला. एकूण लाच प्रकरणात १२ टक्क्यांची वाढ दिसून आली. २०१३ च्या तुलनेत मात्र हा आकडा १३६ टक्के इतका वाढला आहे. २०१३ मध्ये ६३ प्रकरणांत ८७ आरोपी सापडले होते.