शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वाघिणींच्या सुटकेला पुन्हा ब्रेक

By admin | Updated: April 25, 2016 02:49 IST

मागील सात वर्षांपासून वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद असलेल्या पेंच येथील दोन वाघिणींच्या सुटकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वन अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध : वन विभागाच्या पिंजऱ्यात सात वर्षांपासून कैदनागपूर : मागील सात वर्षांपासून वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद असलेल्या पेंच येथील दोन वाघिणींच्या सुटकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या वाघिणींच्या सुटकेसाठी स्वत: राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी पुढाकार घेऊन, तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. परंतु त्याचवेळी वन विभागातील दुसरा एक गट या वाघिणींना सोडण्यास छुपा विरोध करीत आहे. त्यामुळे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांमधील या शीतयुद्धात त्या निर्दोष वाघिणींचे अर्धे आयुष्य पिंजऱ्यात निघून गेले आहे. जाणकारांच्या मते, सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील एन्क्लोजरमध्ये कैद असलेल्या या वाघिणींचे वय सात ते आठ वर्षे झाले आहे. दुसरीकडे जंगलातील कोणत्याही वाघाचे आयुष्य १४ ते १५ वर्षे समजल्या जाते. त्यानुसार या दोन्ही वाघिणींचे अर्धे आयुष्य झाले आहे. अशा स्थितीत त्यांना जंगलात सोडले, तर त्या पोट भरण्यासाठी जंगलात शिकार करू शकतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही वाघाचा बछडा हा लहानपणी आपल्या आईकडून शिकारीची कला आत्मसात करीत असतो. परंतु या दोन्ही वाघिणी लहानपणापासून आपल्या आईसोबत राहिल्याच नाही. त्यांचे संपूर्ण बालपण वन विभागाच्या पिंजऱ्यातच गेले आहे. त्यामुळे त्यांच्यातील शिकार कौशल्यावरसुद्धा शंका व्यक्त केली जात आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने यापैकी एका वाघिणीला पेंचच्या जंगलात सोडण्याचा प्रयोग केला होता. परंतु २०-२२ दिवसानंतर त्या वाघिणीला पुन्हा पिंजऱ्यात घ्यावे लागले होते. वन अधिकाऱ्यांच्या मते, ती वाघीण जंगलाशेजारच्या गावाकडे जात होती. शिवाय तिने कोणतीही शिकार केली नव्हती. त्यामुळे तिला पुन्हा पिंजऱ्यात घेऊन, त्यानंतर वाघिणींना जंगलात सोडण्याचा मुद्दा हा कायमचा थंडबस्त्यात पडला होता. परंतु श्री भगवान यांनी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पदाचा कार्यभार स्वीकारताच पुन्हा या वाघिणींना जंगलात सोडण्याची चर्चा सुरू झाली. शिवाय काहीच दिवसांत श्री भगवान यांनी एपीसीसीएफ रामबाबू यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समितीसुद्धा स्थापन केली. या समितीने मागील काही दिवसांपूर्वी पेंंच येथे भेट देऊन त्या दोन्ही वाघिणींची पाहणी केली. शिवाय इतरही गोष्टींचे निरीक्षण केले. यानंतर समितीच्या सर्व सदस्यांची बैठक घेऊन, वाघिणींना सोडण्याच्या मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र त्यावर सदस्यांचे एकमत होऊ न शकल्याने,वाघिणींच्या सुटकेला ‘ब्रेक’ लागला आहे. (प्रतिनिधी)