पीडब्ल्युडीमधील काम वाटपाची अधिकाऱ्यांची साखळी तोडा
By कमलेश वानखेडे | Updated: January 7, 2025 18:16 IST2025-01-07T18:15:52+5:302025-01-07T18:16:47+5:30
Nagpur : राष्ट्रवादीकडून सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंत्यांना घेराव

Break the chain of officials in PWD work allocation
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागात लहान व गरीब कंत्राटदारांना कामे दिली जात नाहीत. बड्टा व धनाड्य कंत्राटचदारांना निविदा मॅनेज करून कामे दिली जातात. अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे. ही साखळी तोडावी व अशा अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातर्फे विभागाचे मुख्य अभियंता नंदनवार यांना घेराव घालण्यात आला.
शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्त्वात तानाजी वनवे, रमन ठवकर, जानबा मस्के, विशाल खांडेकर, रवी पराते, राकेश बोरीकर, अमरीश ढोरे, समीर राहाटे, राहुल कांबळे,राजु मिश्रा, विश्वास पकिर्डे, एकनाथ फलके, मनिषा शाहु ब्रह्मानंद मस्के, भारतीय गायधने, सुशांत पाली, कनिजा बेगम, शहाजा बाजी आदींनी मुख्य अभियंता यांचे कार्यालय गाठून त्यांना घेराव घातला. यावेळी पवार म्हणाले, विभागातील काही अधिकारी १० टक्के कमीशन घेऊनच कामे देतात. त्या अधिकाऱ्यांकडे, त्यांच्या पत्नीकडे, मुलांकडे दोन दोन लाखांचे मोबाईल, महागड्या गाड्या कुठून आल्या याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करावी व संबंधितांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली. आठ दिवसात याबाबत संपूर्ण मिळाली नाही तर याहीपेक्षा मोठा मोर्चा आणण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात मनीषा शाहू, नारायण मुकवाने, दिनेश रोडके, इसराइल अन्सारी, मोरेश्वर अंबादे , रवी शाहू, इजराइल अन्सारी,सोहेल सयानी, मोरेश्वर अंबाडे, सुधीर पाटील, अनंता फुलझडे, जावेद भाई, फईम भाई, ज्ञानेश्वर प्रमोद बेले आदी सहभागी झाले.