शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पेयजल योजनेला ब्रेक

By admin | Updated: January 31, 2016 02:55 IST

ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, तसेच नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे,

गणेश हूड नागपूरग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, तसेच नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने युपीए सरकारच्या काळात राष्ट्रीय पेयजल योजना हाती घेण्यात आली होती. गत काळात या योजनेच्या माध्यमातनू हजारो गावांतील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला. परंतु गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने या योजनेचा निधी थांबविल्याने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील २१८ पाणीपुरवठा योजनांना ब्रेक लागले आहेत. हा कार्यक्रम मागणी आधारित असल्याने ज्या गावात पाणीटंचाई आहे, तसेच जी ग्रामपंचायत पाणीपट्टी वसूल करु न देखभाल व दुरुस्तीसाठी सक्षम आहे, अशाच गावांची निवड या योजनेसाठी केली जाते. त्यानुसार २०१५-१६ या वर्षासाठी सहा जिल्ह्यातील ३४५ गावांतील योजनांचा समावेश करून यासाठी २५०.९७ कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता.यात नागपूर जिल्ह्यातील १०२, वर्धा ५८, भंडारा ३६, गोंदिया ४८, चंद्रपूर ५० व गडचिरोली जिल्ह्यातील ५१ योजना प्रस्तावित होत्या. यासाठी केंद्र व राज्य सरकारचा प्रत्येकी ५० टक्के निधी अपेक्षित होता. मात्र केंद्र सरकारकडून १२६ कोटींचा निधी अपेक्षित असताना जेमतेम ४५.८६ कोटी तर राज्य सरकारकडून ८२.२३ कोटी मिळाले. पुरेसा निधी न मिळाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आराखड्यातील ११० योजनांचीच कामे पूर्ण करता आली. दरम्यान १२ जुलै २०१५ च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने योजनासंदर्भात आदेश निर्गमित केले. त्यानुसार २९ जून २०१५ पूर्वी कार्यादेश दिलेल्या योजनांवरच उपलब्ध निधी खर्च करावयाचा आहे. तसेच ज्या योजना निविदा प्रक्रियेत आहेत, अशा योजनांची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते. केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होत नसतानाच या आदेशामुळे नागपूर विभागातील राष्ट्रीय पेयजल योजनांच्या कामांना ब्रेक लागले आहेत.