शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

नागपुरातील शनिमंदिराचे कुलूप तोडून दानपेटीवर कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 12:21 AM

धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या मार्गावर असलेल्या शनिमंदिरामधील दानपेटीवर हक्क सांगण्यावरून नातेवाईकांचे दोन गट समोरासमोर आले. यातील एका गटाने मंदिराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यामुळे काही काळ वातावरण गरम झाले होते.

ठळक मुद्देदोन गटात वाद : प्रकरण पोलिस ठाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या मार्गावर असलेल्या शनिमंदिरामधील दानपेटीवर हक्क सांगण्यावरून नातेवाईकांचे दोन गट समोरासमोर आले. यातील एका गटाने मंदिराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यामुळे काही काळ वातावरण गरम झाले होते.धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोहा पुलाजवळ हे पुरातन मंदिर आहे. या शनिमंदिरात भाविकांची नेहमीच वर्दळ असते. तेथे मोठ्या प्रमाणावर दान देणगी येते. दानपेटीवर आपला हक्क आहे, असे सांगून शर्मा परिवारातील मंडळींमध्ये दोन परस्परविरोधी गट पडले आहेत. यातील एका गटातील महिला, पुरुषांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजता मंदिराच्या गेटचे कुलूप हातोडीने तोडून मंदिरात प्रवेश केला आणि दानपेटीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या गटाला ही माहिती कळताच त्यांनीही तेथे धाव घेतली. दोन्ही गट समोरासमोर झाल्याने वातावरण गरम झाले. ही माहिती नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून धंतोली पोलिसांना कळली. त्यामुळे पोलिसांनी तेथे जाऊन दोन्ही गटांतील मंडळींना ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दोन्ही गट एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करीत होते. दोन्ही गटांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदविण्याची भूमिका घेतली. या प्रकरणात वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :TempleमंदिरnagpurनागपूरPolice Stationपोलीस ठाणे