शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलचा विक्रम मोडला

By admin | Updated: April 22, 2016 04:43 IST

वाढत्या तापमानातील उष्ण लाटांमुळे उपराजधानीतील संपूर्ण जनजीवन होरपळून निघाले आहे. त्यातच गुरुवारी

नागपूर : वाढत्या तापमानातील उष्ण लाटांमुळे उपराजधानीतील संपूर्ण जनजीवन होरपळून निघाले आहे. त्यातच गुरुवारी नागपुरातील तापमानाने मागील पाच वर्षांतील एप्रिल महिन्यामधील सर्वोच्च तापमानाचा विक्रम मोडीत काढून ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. यामुळे माणसांसह पशु-पक्ष्यांच्या जीवाची लाही-लाही होऊ लागली आहे. शिवाय संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुरुवारचा दिवस हा नागपूरकरांसाठी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वांत ‘हॉट’ राहिला आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार यापूर्वी गत ३० एप्रिल २००९ रोजी नागपुरातील तापमान ४७.१ अंशावर पोहोचले होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे, १७ एप्रिल २०१० रोजी सर्वोच्च तापमान ४५.२ अंश सेल्सिअस राहिले होते. मात्र यानंतर मागील पाच वर्षांत एप्रिल महिन्यातील तापमान कधीच ४५ अंशावर गेले नाही. परंतु गुरुवारी तब्बल पाच वर्षानंतर पुन्हा नागपुरातील तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता. पाहता-पाहता दुपारी १२ वाजता रखरखत्या उन्हाचे चटके बसू लागले. यामुळे शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. जिकडे-तिकडे शुकशुकाट दिसून येत होता. हा सर्व परिणाम ४५ अंश सेल्सिअसचा होता. यामुळे दिवसभर संपूर्ण शहरात उन्हाचीच चर्चा होती. प्रत्येक जण आजचे कमाल तापमान किती ते जाणून घेण्यासाठी उत्सुक दिसून येत होता. त्यामागील कारणही तसेच होते, तापमानाने पाच वर्षांचा विक्रम मोडला होता.हे करा....भर उन्हात उघड्या डोळ्यांनी जाऊ नका, टोपी घालून किंवा ‘अ‍ॅण्टी रिप्लेक्शन कोटींग’ असलेले गॉगल्स वापरा.तीनवेळा डोळे थंड पाण्याने धुवा.भरपूर मात्रेत पाणी प्या.सकाळी व्यायाम करा.‘व्हिटॅमिन ए’असलेले पदार्थ जसे दूध, गाजर, पपई, आंबा, अंडे, मासे याचे सेवन करा.‘कोल्ड्रिंक’पेक्षा निंबू पाणी प्या, यामुळे ‘व्हिटॅमिन सी’ मिळेल.