बजाजनगरात धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:06 IST2021-07-12T04:06:49+5:302021-07-12T04:06:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - हॉलमधील लॉकरमध्ये ठेवलेली रोकड तसेच सोन्याचांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या ...

Brave theft in Bajajnagar | बजाजनगरात धाडसी चोरी

बजाजनगरात धाडसी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - हॉलमधील लॉकरमध्ये ठेवलेली रोकड तसेच सोन्याचांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ जून ते ९ जुलै दरम्यान ही चोरीची घटना घडली.

लक्ष्मीनगरात दक्षिण अंबाझरी मार्गावर सिद्धेश सुनील धिराडीकर (वय ३३) राहतात. २४ जूनला दुपारी ११.५० वाजता सिद्धेशच्या पत्नीने रोख ३७ हजार तसेच घरातील सोन्याचांदीचे दागिने मोठ्या रूममधील (हॉल) लॉकरमध्ये ठेवले. लॉकरची चावी त्यांनी बाजूलाच ठेवली. दरम्यान, ९ जुलैला त्यांनी लॉकर उघडून बघितले असता त्यात रक्कम आणि दागिने दिसले नाही. ते चोरीला गेल्याची खात्री पटल्यानंतर सिद्धेश यांनी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. ही चोरी संपर्कातील व्यक्तीनेच केली असावी, असा संशय आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

---

Web Title: Brave theft in Bajajnagar