शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

शेखूसह दोघांना अटक

By admin | Updated: January 17, 2017 01:48 IST

धरमपेठ येथील मोठी लाहोरी बारसमोर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार उत्थाननगर राठोड ले-आऊट येथील रहिवासी गुलनवाजखान ऊर्फ शेखू एजाजखान याच्यासह दोघांना अटक केली.

दहा दिवसांची पोलीस कोठडी : लाहोरी बार गोळीबार प्रकरणनागपूर : धरमपेठ येथील मोठी लाहोरी बारसमोर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार उत्थाननगर राठोड ले-आऊट येथील रहिवासी गुलनवाजखान ऊर्फ शेखू एजाजखान याच्यासह दोघांना अटक केली. त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ओ. जैन यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा दहा दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला.रविशसिंग असे शेखूच्या साथीदाराचे नाव आहे. शेखू आणि साथीदारांनी १३ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास लाहोरी बारसमोर गोळीबार केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार प्रकरण असे की, बेसा पॉवरहाऊसजवळील गजानन अपर्टमेंट येथील रहिवासी पवन चौधरी हा आपल्या मित्रांना सोबत घेऊन १३ नोव्हेंबरच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दारू पिण्यासाठी लाहोरीबारमध्ये गेला होता. पवन आणि त्याचे मित्र दारू पिऊन डान्स करू लागले होते. त्याच वेळी एक तरुण आणि तरुणी दारूच्या नशेत डान्स करीत असताना तरुणीसोबत असलेल्या रोशन नावाच्या तरुणाने पवनचा मित्र हर्षल राऊत याची कॉलर पकडून ,‘तब से मै देख रहा हू तुझे, तू मेरी गर्लफ्रेन्ड के तरफ देख रहा है’ असे म्हणत बार बाऊंसर श्रीकांत वनवे याला बोलावून हर्षल याला बाहेर काढण्यास सांगितले होते. बाऊन्सरने हर्षलची कॉलर पकडून बाहेर काढले होते. पवन आणि त्याच्या मित्रांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करताच सात-आठ जणांनी मारहाण करून त्यांना धक्के देत बारच्या बाहेर काढले होते. त्याचवेळी पवनसोबतचे लोक ‘शेखू खान और माया गँग इनको हम लेके आते है,’ असे म्हणत निघून गेले होते. पवन याने ही घटना मीर मिश्रा याला सांगताच तो आपल्या साथीदारांना कारममध्ये बसवून लक्ष्मीभुवन चौकात आला होता. काही वेळाने हे सर्व जण बारच्या पुढे येताच बारमालकाने या लोकांच्या दिशेने गोळीबार केला होता. त्याच वेळी मीर मिश्रा आणि त्याच्या साथीदारांनीही गोळीबार करून बारवर दगडफेक केली होती. गुन्हे शाखा पोलिसांनी शेखू आणि रविश यांना अटक केल्यानंतर उपनिरीक्षक सचिन लुले यांनी त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करून त्यांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. शेखू हा ३० डिसेंबर २०१५ रोजी भाजयुमोचा नेता हेमंत दियेवार याच्या खुनातून निर्दोष सुटला आहे.(प्रतिनिधी)