नव्या व्हेरियंटचा सामाना करण्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बुस्टर डोस; कोराना ‘जेएन.१’व्हेरियंटसाठी मनपा यंत्रणा सज्ज

By सुमेध वाघमार | Published: December 22, 2023 05:39 PM2023-12-22T17:39:15+5:302023-12-22T17:39:34+5:30

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत.

Booster dose for citizens above 60 years to suit the new variant in nagpur | नव्या व्हेरियंटचा सामाना करण्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बुस्टर डोस; कोराना ‘जेएन.१’व्हेरियंटसाठी मनपा यंत्रणा सज्ज

नव्या व्हेरियंटचा सामाना करण्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बुस्टर डोस; कोराना ‘जेएन.१’व्हेरियंटसाठी मनपा यंत्रणा सज्ज

नागपूर : कोरोनाच्या ‘जेएन.१’ या नव्या व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लवकरच नाकाद्वारे देणारे येणारे बुस्टर डोस उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक घेउन निर्देश दिले. त्यानंतर नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चौधरी यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेत रुग्णालयांची स्थिती जाणून घेतली. ‘जेएन.१’ व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि आॅक्सिजन बेड्सची यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. शहरतील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मनपाद्वारे नाकाद्वारे देण्यात येणा-या बुस्टर डोसबाबत नियोजन करण्याचे देखील निर्देश दिले.

गरज पडल्यास कोरोनाची चाचणी करा

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे होणारा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याची गरज आहे. सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा व आवश्यकता असल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे कोरोना चाचणी केंद्र सुरू आहेत. याशिवाय नागपूर महानगरपालिकेची चाचणी केंद्र देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. नागरिकांनी कोरोनामुळे होणारा धोका लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी जाताना सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. मास्क लावणे, नियमित हात धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे यासारख्या सवयी पुन्हा एकदा अंगीकारण्याचे आवाहनही केले आहे.

Web Title: Booster dose for citizens above 60 years to suit the new variant in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.