शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचा निर्घृण खून

By admin | Updated: April 28, 2016 03:00 IST

जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना कामठीच्या बुनकर कॉलनीतील

कामठीतील थरार : एकास अटक; पाच फरारकामठी : जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना कामठीच्या बुनकर कॉलनीतील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील क्रीडांगणावर मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कामठीत काही वेळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. या प्रकरणी कामठी पोलिसांनी एकास अटक केली असून पाच जण फरार आहेत.शमसुद्दीन ऊर्फ समसू सलाउद्दीन पठाण (३५, रा. नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळेजवळ, इस्लाईमपुरा) असे मृताचे नाव आहे. तर अकरममुल्ला, साजीद अख्तर जामील अख्तर अंसारी, साहीद सदू, मेहताब बोकना, शहदाद अंसारी अशी आरोपींची नावे आहेत. शमसुद्दीन याच्याकडून अकरममुल्ला याने महिनाभरापूर्वी पैसे घेतले होते. त्यातूनच त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. मात्र त्यांच्यात आपसी समझोता झाल्याने तेव्हा प्रकरण शांत झाले. दुसरीकडे अकरममुल्ला हा शमसुद्दीनला संपविण्याचा डाव आखत होता. अशात शमसुद्दीन हा त्याचा मित्र जफर अब्बास बरकत अली (२८, रा. आजादनगर) याच्यासोबत मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास बसस्थानकाजवळच्या रिक्षा स्टॅन्डवर बसला होता. तेवढ्यात अकरममुल्लाने शमसुद्दीनला फोन करून पैसे परत करायचे आहे, असे सांगून बुनकर कॉलनीतील मैदानात बोलविले. तेथे जाताच आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी शमसुद्दीनवर तलवार, चाकू, भाल्याने हल्ला केला. त्यात तो रक्तबंबाळ होऊन पडला. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपींनी तेथून पळ काढला. याबाबत शमसुद्दीनच्या भावाला माहिती मिळताच तो घटनास्थळी दाखल झाला. मात्र तोपर्यंत शमसुद्दीनचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार उत्तम मुळक, सहायक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, हेडकॉन्स्टेबल मनोज चौधरी हे घटनास्थळी गेले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. याप्रकरणी कामठी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, १४७, १४८, १४९ सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. यापैकी साजीद अख्तर जामील अख्तर अंसारी (२९, रा. कामठी) याला अटक केली. उर्वरित पाच आरोपी फरार झाले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)