नागपुरात ब्लींकिटचे स्टोअर सील, तर बिग बास्केटला दणका; एफडीएची कारवाई

By मोरेश्वर मानापुरे | Updated: February 14, 2026 19:18 IST2026-02-14T19:16:28+5:302026-02-14T19:18:32+5:30

Nagpur : ऑनलाईन डिलिव्हरीच्या नावाखाली नियमांची पायमल्ली करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नागपुरात मोठी मोहीम उघडली आहे.

Blinkit store sealed in Nagpur, while Big Basket gets a blow; FDA action | नागपुरात ब्लींकिटचे स्टोअर सील, तर बिग बास्केटला दणका; एफडीएची कारवाई

Blinkit store sealed in Nagpur, while Big Basket gets a blow; FDA action

नागपूर : ऑनलाईन डिलिव्हरीच्या नावाखाली नियमांची पायमल्ली करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नागपुरात मोठी मोहीम उघडली आहे. १३ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या कारवाईत धरमपेठ येथील ह्यब्लींकिट स्टोअर सील करण्यात आले असून, सरोजनगर येथील बिग बास्केटवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे. विनापरवाना व्यवसाय आणि खाद्यपदार्थांमधील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

ब्लींकिटचे स्टोअर विनापरवाना

एफडीएच्या दक्षता विभागाने धरमपेठ येथील ब्लींकिट कॉमर्स प्रा. लि.च्या स्टोअरची तपासणी केली असता, धक्कादायक बाब समोर आली. अन्न सुरक्षा व मानदे कायदा-२००६ नुसार, कोणत्याही अन्न पदार्थांची विक्री करण्यासाठी आवश्यक असलेला ह्यराज्य परवाना या स्टोअरकडे नसल्याचे आढळले. विनापरवाना अन्न व्यवसाय करणे हा गंभीर गुन्हा असल्याने, प्रशासनाने या स्टोअरला परवाना मिळेपर्यंत कोणताही व्यवसाय न करण्याचे आदेश देत स्टोअर सील केले आहे.

ब्राऊन ब्रेडच्या नावाखाली ९० टक्के मैदा !

तपासणी दरम्यान स्टोअरमध्ये ह्यअजित बेकरी, नागपूरद्वारे उत्पादित केलेला ब्राऊन ब्रेड विक्रीसाठी ठेवलेला आढळला. या ब्रेडच्या गुणवत्तेबाबत मोठी फसवणूक समोर आली. अन्न सुरक्षा मानकांनुसार, ब्राऊन ब्रेडमध्ये कमीत कमी ५० टक्के ह्यहोल व्हीट फ्लोर (आटा) असणे अनिवार्य आहे. मात्र, अजित बेकरीच्या या ब्रेडमध्ये केवळ १० टक्के आटा होता, तर उर्वरित ९० टक्के मैदा वापरण्यात आला होता. नियमांचे उल्लंघन झाल्याने या ब्रेडचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, उर्वरित सर्व साठा जप्त करण्यात आला आहे.

बिग बास्केटलाही व्यवसाय करण्यास मनाई

अशीच कारवाई सरोजनगर येथील बिग बास्केटच्या स्टोअरवरही करण्यात आली. तपासणीमधील त्रुटी आणि नियमांचे पालन न झाल्यामुळे या स्टोअरलाही अन्न व्यवसाय करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

ब्राऊन ब्रेड खाणाऱ्या ग्राहकांनी लेबल नीट वाचावे. मैदायुक्त ब्रेड ब्राऊन ब्रेड म्हणून विकणे हा ग्राहकांचा विश्वासघात आहे. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही संस्थेला सोडले जाणार नाही, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (दक्षता, मुंबई) डॉ. राहुल खाडे आणि सहायक आयुक्त यदुराज दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम, रावसाहेब वाकडे, अमर सोनटक्के आणि वर्षा खरात यांच्या पथकाचा समावेश होता.

Web Title : नागपुर: एफडीए की कार्रवाई में ब्लिंकिट स्टोर सील, बिग बास्केट पर गिरी गाज

Web Summary : नागपुर में एफडीए ने बिना लाइसेंस के संचालन के लिए ब्लिंकिट स्टोर को सील कर दिया और बिग बास्केट के खिलाफ कार्रवाई की। ब्राउन ब्रेड के नमूनों में अधिकतर मैदा पाया गया, जिससे उपभोक्ताओं को गुमराह किया जा रहा था। अधिकारियों ने अनाधिकृत व्यवसायों के खिलाफ चेतावनी दी।

Web Title : Nagpur: Blinkit Store Sealed, Big Basket Hit by FDA Action

Web Summary : Nagpur FDA sealed a Blinkit store for operating without a license and took action against Big Basket for violations. Brown bread labeled samples contained mostly refined flour, misleading consumers. Authorities warned against unauthorized businesses.